Letest news यावल तालुक्यातील चिंचोली जवळ मनुदेवी फाट्यावर हॉटेल रायबा येथे अज्ञात हल्लेखोरांनी मालकावर गोळीबार केला. Letest news गंभीर जखमी झालेल्या मालकाला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे.Letest news
Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?
Craime newsयावल, ता.११ जुलै – यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल रायबा येथे काल संध्याकाळी घडलेल्या Yaval firing गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलच्या मालकावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहिती नुसार…
प्राप्त माहितीनुसार, हॉटेल रायबा हे काही काळ बंद होते. मात्र अलीकडेच हे हॉटेल पुन्हा सुरू करण्यात आले होते. आज संध्याकाळच्या सुमारास दोन तरुण Manudevi fata, Jalgaon crime news मोटारसायकलवरून हॉटेलमध्ये आले. त्यांनी बीयरची मागणी केली. मात्र, हॉटेलचे मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय अंदाजे ४०) यांनी बार बंद झाल्याचे सांगून बीयर देण्यास नकार दिला. त्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यापैकी एक तरुणाने अचानक पिस्तुल gun attack काढून गोळ्या झाडल्या.
Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?
गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवले
गोळी लागल्याने बाविस्कर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी अजूनही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
पोलीस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात नाकाबंदी करून संशयितांचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरून काही पुरावे हस्तगत करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास अधिक वेगाने सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
या थरारक घटनेमुळे चिंचोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागात अचानक घडलेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.
पुढील तपास सुरू असून हल्लेखोर लवकरच जेरबंद होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
(ही घटना अजूनही तपासाधीन आहे. अधिकृत पोलीस निवेदन प्राप्त होताच पुढील माहिती दिली जाईल.)