UPSC EPFO भरती 2025 अंतर्गत 230 पदांसाठी अधिसूचना जारी; EO/AO आणि APFC पदांसाठी 29 जुलै ते 18 ऑगस्ट 2025 दरम्यान ऑनलाइन अर्ज करा.
केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) मध्ये नोकरी करण्याची इच्छित असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत Enforcement Officer/Accounts Officer (EO/AO) आणि Assistant Provident Fund Commissioner (APFC) या पदांसाठी एकूण 230 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती विशेष जाहिरात क्रमांक 52/2025 अंतर्गत असून, 29 जुलै 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 18 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

ही भरती थेट निवड पद्धतीने करण्यात येणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना EPFO च्या विविध शाखांमध्ये जबाबदारीची पदे सांभाळावी लागतील. या पदांसाठी पदवीधर उमेदवार पात्र असून, शासकीय नोकरीची स्थिरता, सातव्या वेतन आयोगानुसार आकर्षक वेतन आणि सेवानिवृत्तीपर्यंत विविध लाभ यामुळे ही भरती अनेकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या भरतीसाठीचे सर्व तपशील UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) अंतर्गत 230 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत Enforcement Officer/Accounts Officer (EO/AO) आणि Assistant Provident Fund Commissioner (APFC) या दोन पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) लक्षात ठेवावी.
या भरतीसाठी UPSC ने Special Advertisement No. 52/2025 जाहीर केला असून ही भरती थेट निवड (Direct Recruitment by Selection) पद्धतीने केली जाणार आहे.

प्रवर्ग EO/AO APFC
खुला (UR) 78 32
आर्थिक दुर्बल घटक (EWS) 1 7
इतर मागासवर्गीय (OBC) 42 28
अनुसूचित जाती (SC) 23 7
अनुसूचित जमाती (ST) 12 0
PwBD (अपंग) 9 3
एकूण 156 74
पात्रता अटी:
EO/AO साठी
पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा: UR/EWS – 30, OBC – 33, SC/ST – 35, PwBD – 40 वर्षांपर्यंत

APFC साठी
पात्रता: पदवी (Company Law, Labour Laws किंवा Public Administration मध्ये डिप्लोमा असल्यास प्राधान्य)
वयोमर्यादा: UR/EWS – 35, OBC – 38, SC – 40, ST – 35, PwBD – 45 वर्षांपर्यंत
पदांचा दर्जा व वेतनश्रेणी:UPSC EPFO भरती 2025
EO/AO – Group ‘B’, Pay Level-08 (7व्या वेतन आयोगानुसार)
APFC – Group ‘A’, Pay Level-10 (7व्या वेतन आयोगानुसार)
या पदांवर नियुक्त झालेल्या उमेदवारांना EPFO अंतर्गत वसुली, लेखा, कायदेशीर बाबी, पेन्शन प्रक्रिया, आयटी व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी पार पाडावी लागेल.
अर्ज प्रक्रिया:UPSC EPFO भरती 2025
1. UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जा – https://upsconline.nic.in
2. संबंधित भरतीसाठी “Online Recruitment Application (ORA)” लिंकवर क्लिक करा
3. नोंदणी करून लॉगिन करा
4. वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
5. अर्ज फी भरून सबमिट करा
6. अंतिम अर्जाची प्रिंट काढून ठेवा

महत्त्वाचे:UPSC EPFO भरती 2025
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील
PwBD (अपंग) उमेदवारांसाठी राखीव जागा व आवश्यक सवलती लागू
सध्याच्या शासकीय सेवकांना काही अटींवर पगार व पेन्शन योगदान चालू ठेवण्याची मुभा
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 18 ऑगस्ट 2025 पूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी UPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
वेबसाइट: https://upsconline.nic.in
अंतिम दिनांक: 18 ऑगस्ट 2025
UPSC EPFO भरती 2025
संबंधीत बातम्या👇🏻
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर