पाचोरा, दि.९ सप्टेंबर २०२५ – गेल्या बारा-तेरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत राहून पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविणारे भुवनेशभाऊ दुसाने यांनी नुकताच पाचोरा भडगांव विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार किशोअप्पा पाटिल यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला.
पत्रकार भुवनेश दुसाने यांनी शिवसेना पक्षात केलेला पक्ष प्रवेश केवळ राजकीय पाऊल नसून वैचारिक एकात्मतेचा दणदणीत क्षण असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी भगवे झेंडे, जयघोष आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे भुवनेश दुसाने यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाची बातमी : आजच्या मंत्री मंडळ बैठकीत झाले ४ मोठे निर्णय!
यावेळी आमदार किशोरआप्पा पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोरआप्पा बारस्कर, शहरप्रमुख सुमित आबा सावंत, तसेच निलेशभाऊ मराठे, हेमंतभाऊ चौधरी, भरतभाई भैरू यांसारखे प्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.
आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विकासाच्या व्हिजन मुळेच मी शिवसेनेत – भुवनेश दुसाने
पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना भुवनेशभाऊ दुसाने म्हणाले की, “शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून ती सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ आहे. मी गेली अनेक वर्षे पत्रकारितेतून समाजातील वास्तव मांडण्याचे काम केले, मात्र आता थेट जनतेच्या सोबत उभं राहून त्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची संधी मला मिळाली आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांनी मला प्रेरणा दिली असून, पंपिंग रोड व पाचोरा शहराच्या प्रगतीसाठी मी पूर्ण ताकदीने कार्यरत राहणार आहे.”

वैचारिक प्रेरणा आणि जनकल्याणाचा संकल्प
भुवनेशभाऊ दुसाने यांच्या प्रवेशामुळे केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक आणि वैचारिक स्तरावर नवा अध्याय सुरू झाला आहे. पत्रकारितेतून दीर्घकाळ सत्यासाठी लढा देत त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता त्यांनी थेट शिवसेनेच्या विचारधारेत सामील होत, पंपिंग रोड परिसरासह पाचोरा शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या वैचारिक भूमिकेमुळे स्थानिक तरुणाई आणि नागरिकांना नवा आत्मविश्वास मिळत असून, पक्ष संघटनेला नवचैतन्य प्राप्त झाले आहे.पत्रकारितेतून समाजहितासाठी योगदान देणारे भुवनेशभाऊ आता थेट समाजकारणाच्या माध्यमातून जनतेच्या विकासासाठी कार्यरत राहणार आहेत.
पंपिंग रोडवरील विकासकामे
आ. किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंपिंग रोड परिसरात मागील काही वर्षांत उल्लेखनीय कामे झाली आहेत.नवे रस्ते व गटारी,ओपन स्पेसचे सुशोभीकरण,सोलर लाईटची व्यवस्था,झाडलागवड उपक्रम,यामुळे स्थानिक नागरिकांनी “हा प्रवेश म्हणजे पंपिंग रोड विकासाचा नवा महामार्ग आहे” अशा भावना व्यक्त केल्या.भुवनेश दुसाने यांच्या प्रवेशामुळे तरुणाई व महिला गटांनी विशेष स्वागत केले केले असून समाजातून भावी वाटचालीस शुभेच्छाचा वर्षाव होतं आहे.