जळगाव, दि. ५ ऑगस्ट (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा वकील संघाच्या २०२५-२६ कार्यकारिणीसाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. सागर एस. चित्रे यांना स्पष्ट बहुमत मिळवून विजय मिळवला आहे. आज मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर रात्री उशिरा पर्यंत मतमोजणी पार पडली.

अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत ॲड. सागर चित्रे यांनी ४५२ मते मिळवून विजय मिळवला. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी ॲड. संजय राणे यांना ३५३ मते मिळाली. इतर दोन उमेदवारांपैकी ॲड. गोपाल जळमकर यांना ६४ तर ॲड. किशोर भारंबे यांना केवळ ५ मते मिळाली.
निवडणूक शांततेत पार पडली असून मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नव्याने निवडून आलेले व कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होतं आहे.