Revenue officer trap : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लाच Trap दरम्यान महसूल अधिकारी व एजंटला रंगेहाथ पकडण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे खळबळ.
जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात लाच : महसूल अधिकारी आणि एजंट रंगेहाथ अटकेत (Revenue officer trap)
महत्वाची बातमी वाचा :पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!
जळगाव (24 जुलै) – जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख विभागात कार्यरत सहायक महसूल अधिकारी प्रशांत सुभाष ठाकूर (वय ४९) आणि खासगी एजंट संजय प्रभाकर दलाल (वय ५८, रा. शिव कॉलनी) यांना (Revenue officer bribe Jalgaon) लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

हे पण वाचा : गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!
हे पण वाचा : महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार
अतिक्रमण प्रकरणात लाच मागणी
तक्रारदाराने त्यांच्या गावातील ग्रामपंचायत व सदस्यांविरोधात दाखल अतिक्रमण प्रकरणाची कागदपत्रं मिळवण्यासाठी १६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. मात्र नकला देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाच मागणाऱ्यांमध्ये सहायक महसूल अधिकारी ठाकूर आणि एजंट संजय दलाल यांचा समावेश होता.Revenue officer trap
हे पण वाचा : समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!
सापळा रचून कारवाई
तक्रारदाराने २३ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाने सापळा रचून २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात Trap कारवाई केली. त्यात लाच घेताना दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

संजय दलाल याने “₹१४०० शासकीय फी आणि ₹६०० आमचे” असे म्हणून लाच स्वीकारली. प्रत्यक्षात तपासणीत ₹११२० लाच आणि ₹८८० शासकीय शुल्क असल्याचे स्पष्ट झाले.
हे पण वाचा : 5 कोटींचा चेक गिफ्ट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?
हे पण वाचा : Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या
कोण करतंय तपास?
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक सुरेश पाटील, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी हे करत आहेत.Revenue officer trap

“शासकीय कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे लाच मागितली गेल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. हे अन्यायकारक असून प्रशासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत,” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या प्रकरणामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र संताप आहे.
“कर्मचाऱ्यांच्या अशा लाचखोरीमुळे सामान्य माणसाला एक साधी प्रत मिळवण्यासाठी सुद्धा शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.Revenue officer trap
सर्वसामान्य नागरिकांनी अशा लाचखोरीच्या घटनांमध्ये स्वतःला त्रास सहन करत शांत बसण्याऐवजी पुढाकार घ्यावा, ही काळाची गरज आहे. खाली काही ठोस उपाय सुचवले आहेत — “नागरिकांनी काय करावे?” :
नागरिकांनी काय करावे?
1. लाच मागितल्यास त्वरित तक्रार करा
जर शासकीय कर्मचारी कोणत्याही कामासाठी थेट किंवा अप्रत्यक्षपणे लाच मागत असेल, तर त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कडे तक्रार करावी.
महाराष्ट्र ACB टोल-फ्री क्रमांक: 1064
अधिकृत वेबसाइट: https://acb.maharashtra.gov.in
मोबाईलवरून तक्रार करता येणारी सोपी पद्धत आहे.
2. कामाचा तपशील आणि पुरावे संकलित करा
लाच मागितल्याचे ऑडिओ, व्हिडीओ, मेसेज किंवा व्हॉट्सॲप चॅट इत्यादी शक्य असल्यास रेकॉर्ड ठेवा. हे पुरावे ACB तपासात उपयोगी पडतात.
3. RTI (माहितीचा अधिकार) वापरा
जर कोणतीही माहिती किंवा कागदपत्र सरकारी कार्यालयातून मिळत नसेल, तर RTI द्वारे अधिकृत अर्ज करून ती मागवता येते. यामुळे लाच मागण्याचा प्रकार कमी होतो.
4. इतर त्रस्त नागरिकांसोबत एकत्र या
एखाद्या कार्यालयात वारंवार लाच मागितली जात असेल तर, इतर त्रस्त लोकांसोबत एकत्र येऊन सामुहिक तक्रार किंवा पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाज उठवा.

5. माध्यमांचा वापर करा
सोशल मिडिया, वृत्तपत्रे, स्थानिक पोर्टल्स यांच्यातून आवाज उठवल्यास त्वरित लक्ष दिलं जातं. भ्रष्टाचारावर लोकदबाव निर्माण करणे गरजेचे आहे.
निवडणुकीत जबाबदारीने मतदान करा
जे लोक भ्रष्ट व्यवस्थेचा फायदा घेतात, त्यांना निवडून देणे बंद करणे हाच दीर्घकालीन उपाय आहे. सुज्ञ आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेत पाठिंबा द्या.
“सरकार एकीकडे डिजिटल इंडिया, पारदर्शकता आणि जनतेसाठी सोपी सेवा असे अभियान राबवत असताना, काही अधिकारी मात्र सामान्य जनतेला लाच मागून त्रास देत आहेत. हे थांबवण्यासाठी लोकसहभाग आणि कायदेशीर कृती अत्यावश्यक आहे.”Revenue officer trap

आरोपींची माहिती
1. प्रशांत सुभाष ठाकूर
वय: 49 वर्षे
पद: सहायक महसूल अधिकारी
कार्यरत: अभिलेख विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
2. संजय प्रभाकर दलाल
वय: 58 वर्षे
राहणार: शिव कॉलनी, जळगाव
भूमिका: खासगी एजंट
Revenue officer trap
या महत्वाच्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?
Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या
धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय
जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”
आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय
murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!
थरकाप उडवणाऱ्या हत्येने खळबळ ;पती अडथळा ठरत होता प्रेमात?