Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

भडगाव तालुक्यात गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप; जकात–सदका राही फाउंडेशनला देण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
February 25, 2026
in Uncategorized
0
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव, (नजरकैद न्यूज):-पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजू, गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मदतीसाठी राही मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या वतीने भडगाव तालुक्यात किराणा किट वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी, मानवतावादी दृष्टिकोन आणि सेवाभावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यामुळे अनेक गरजू कुटुंबांना रमजान महिन्यात मोठा आधार मिळाला आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

रमजान महिना हा इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. त्याग, संयम, प्रार्थना, दानधर्म व परस्पर सहकार्याचा संदेश देणारा हा महिना समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित घटकांपर्यंत मदत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. याच भावनेतून राही मल्टीपर्पज फाउंडेशनने भडगाव तालुक्यातील गरजू कुटुंबांची ओळख पटवून त्यांना जीवनावश्यक अन्नधान्य स्वरूपात मदत केली.

या उपक्रमांतर्गत वितरित करण्यात आलेल्या किराणा किटमध्ये तांदूळ, गहू, डाळी, साखर, खाद्यतेल तसेच इतर आवश्यक अन्नधान्याचा समावेश होता. रमजानच्या संपूर्ण महिन्यात कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लागावा, या उद्देशाने हे किट तयार करण्यात आले होते. या मदतीमुळे अनेक कुटुंबांना उपासमार टळण्यास मदत झाली असून, लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला.

या सामाजिक उपक्रमावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष दानिश आलम शेख, उपाध्यक्ष अबरार मिर्झा, सचिव मुजम्मील शेख, खजिनदार हाजी जमालोद्दीन कासार तसेच सदस्य जुनेद आलम व जुबेर बेग उपस्थित होते. याशिवाय फाउंडेशनचे कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध, शांततामय व नियोजनपूर्वक पद्धतीने किराणा किटचे वाटप करून उपक्रम यशस्वी केला.

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी माहिती दिली की, पवित्र रमजान महिना हा तीन अश्रेत (पहिले दहा दिवस – रहमत, दुसरे दहा दिवस – मघफिरत, तिसरे दहा दिवस – निजात) विभागलेला असल्याने त्याच धर्तीवर तीन टप्प्यांत किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने गरजू कुटुंबांना लाभ देण्यात आला असून उर्वरित टप्प्यांतही हा उपक्रम सुरू राहणार आहे.

यावेळी राही मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने समाजातील दानशूर नागरिकांना विशेष आवाहन करण्यात आले. आपण आपली जकात, सदका व आतियात विश्वसनीय व पारदर्शक माध्यमातून योग्य गरजूंपर्यंत पोहोचवू इच्छित असाल, तर ती राही फाउंडेशनकडे सुपूर्द करावी, असे आवाहन करण्यात आले. फाउंडेशनकडे जमा होणाऱ्या निधीचा उपयोग गरिबांचे अन्न, शिक्षण, आरोग्य तसेच इतर मूलभूत गरजांसाठी नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

या सामाजिक उपक्रमामुळे गरजू कुटुंबांच्या दैनंदिन अडचणी काही प्रमाणात दूर झाल्याने लाभार्थ्यांनी फाउंडेशनच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले. “रमजानच्या पवित्र महिन्यात मिळालेली ही मदत आमच्यासाठी मोठा आधार आहे,” अशा भावना अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या.

समाजातील दुर्बल, गरजू व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी भविष्यातही अशा प्रकारचे सेवाभावी, मानवतावादी व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास राही मल्टीपर्पज फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या 👇🏻

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

जम्मू श्रीनगर वंदे भारत ट्रेन : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ;अल्पवयीन गर्भवती, महाराष्ट्र हादरला!

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Next Post

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us