पुण्यातील खराडी येथील हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात राजकीय वर्तुळात खळबळ उडवत एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावर आरोपांची मालिका सुरू झाली आहे. या प्रकरणात महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर आता रोहिणी खडसेंनी ट्विटरच्या माध्यमातून रोष व्यक्त केला असून, त्यांच्या प्रतिक्रियेमुळे प्रकरणाला नव्या राजकीय वळणाची शक्यता निर्माण झाली आहे.
हे पण वाचा – CISF Recruitment 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ७०,००० पदांची भरती जाहीर, लागा तयारीला!
महिला आयोगात सानवी संस्थेची तक्रार – रूम बुकिंग, मुली बोलवणे आणि गंभीर आरोप
पुण्यातील खराडी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये २४ जुलै २०२५ रोजी झालेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली. यात काही महिलांचाही समावेश होता. आता या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार दाखल झाली आहे.
सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, प्राजल खेवलकर यांनी तब्बल २८ वेळा हॉटेलमध्ये रूम बुक करून बाहेरच्या प्रांतातील मुलींना आमिष दाखवून बोलवलं. या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे.
Rohini Khadse reaction : “आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार!”
या प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी ट्विटरवरून तीव्र प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार ! सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे…”त्यांनी अप्रत्यक्षपणे यामागे राजकीय स्क्रिप्ट असल्याचा आरोप केला आहे. तक्रारदार संस्थेच्या अध्यक्ष यांचे महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्या सोबतचा एक फोटो व एक बॅनर सुद्धा शेअर केला आहे.महिला आयोगाने देखील आपल्या अधिकृत ट्विटरवरून तक्रारीची नोंद झाल्याचं जाहीर केलं आहे.
रोहिणी खडसे आपल्या ट्विट मध्ये काय म्हणतात वाचा
नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले.
मुद्दा क्र. १ ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे.
मुद्दा क्र. २ राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती ? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती ? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली ?
मुद्दा क्र. ३ राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसे कर्तव्य आठवले ? इतके कसे कार्यतत्पर झाले? आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार ! सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे…
रोहिणी खडसे यांचे अधिकृत ट्विट 👇🏻
https://x.com/Rohini_khadse/status/1952972226715894162?t=I6TQZX_TZmkGt_tNuAll5Q&s=19
पुढे काय? चौकशी आणि राजकीय वर्तुळात हालचाली
या प्रकरणाची पुणे पोलीस आयुक्तांकडून चौकशी सुरू आहे. राजकीय क्षेत्रात खळबळ उडालेली असतानाच, महिला आयोगाच्या सहभागामुळे प्रकरण आणखीनच गाजत आहे. खेवलकर हे भाजप नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई असल्याने या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता अधिक आहे.
हे प्रकरण केवळ एक गुन्हेगारी प्रकरण राहिले नसून, यामध्ये राजकीय संदर्भ, महिला आयोगाचा हस्तक्षेप आणि रोहिणी खडसे यांची भावनिक आणि रोषपूर्ण प्रतिक्रिया यामुळे अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. पुढील चौकशीमध्ये आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
महिला आयोग महाराष्ट्र यांनी केलेले ट्विट पहा
https://x.com/Maha_MahilaAyog/status/1952704610625626399?t=cWldaGqyuuFmlesTXU_G6A&s=19
https://x.com/Maha_MahilaAyog/status/1952704570918072767?t=b1Hy57oE6o8bod4LYL-7eg&s=19
https://x.com/Maha_MahilaAyog/status/1952704576962072791?t=NRz_FRvZXXUDnSAYXIDeMg&s=19
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
CISF Recruitment 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ७०,००० पदांची भरती जाहीर, लागा तयारीला!
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
Latest news 👇🏻
CBSE New Rule :CBSE चा मोठा निर्णय! 8वी ते 12वीसाठी नवीन नियम लागू
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!
₹5 लाख ते ₹1 कोटी कव्हरेज – तुमच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कोणता?
‘लाडकी बहीण योजना’ : महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये
वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे
मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा
80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम
Motorola G85 5G स्मार्टफोनवर 50% सवलत – 21 हजाराचा मोबाईल Sale मध्ये फक्त ₹10,999
Meesho व्यवसाय करून कमवा लाखो रुपये | घरबसल्या कमाईची संधी, कुठलीही गुंतवणूक नाही!
संबंधीत बातम्या👇🏻
बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?
१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?
Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदे