Prafull Lodha Rape Case | पुण्यात भाजप कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्यावर नव्याने बलात्काराचा गुन्हा दाखल. पतीला नोकरी लावतो, पण शरीरसंबंध ठेवावे लागतील अशी अट महिलेला घालण्यात आली होती, असा आरोप.

नवीन गुन्हा, नव्या अडचणी
राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले भाजप कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. पुण्यातील एका ३६ वर्षीय विवाहित महिलेनं लोढा यांच्याविरोधात बलात्काराची गंभीर तक्रार दाखल केली आहे.
नोकरीचं आमिष देत खाजगी हॉटेलमध्ये बोलावलं
तक्रारीनुसार, २७ मे २०२५ रोजी लोढा यांनी पीडित महिलेला तिच्या पतीला नोकरी लावतो, असे सांगून पुण्यातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी शरीरसंबंध ठेवण्याची अट घातली.
नकार दिल्यावर दिली धमकी, आणि…
महिलेने विरोध केला असता, लोढा यांनी “तुझी आणि पतीची दोघांचीही नोकरी घालवेन,” अशी धमकी दिली. तक्रारीनुसार, त्यानंतर त्यांनी बळजबरीने संबंध ठेवले.
पूर्वीही दाखल आहेत गंभीर तक्रारी
प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात यापूर्वीही दोन तरुणींनी बलात्काराचे गुन्हे मुंबईत दाखल केले आहेत. त्यामुळे या नव्या प्रकरणामुळे त्यांच्यावरचा दबाव अधिकच वाढला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, फोन कॉल्सचे रेकॉर्ड आणि मेसेजेससह सर्व पुरावे जमा केले जात आहेत.