जळगाव,(प्रतिनिधी)- पोलिस भरती (police bharti) दरम्यान धावताना अमळनेर येथील तरुणाचा धाप लागून मृत्यू झाल्याची घटना २९ रोजी बालेगाव (जि. ठाणे) येथे घडली. अक्षय मिलिंद बिऱ्हाडे (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील अक्षय मिलिंद बिऱ्हाडे हा तरुण २७ रोजी पोलिस भरतीसाठी बालेगाव येथे गेला होता.२९ रोजी मैदानी चाचणीसाठी धावत असताना ३-४ किमीनंतर त्याला भोवळ आली, अन् तो जमिनीवर कोसळला. त्याला ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. एकुलता एक मुलगा गमविल्याने आई-वडिलांनी टाहो फोडला. अक्षय हा प्रताप महाविद्यालयात कला शाखेच्या अंतिम वर्षाला होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.










