PM Awas Yojana जळगावच्या लोणवाडी येथील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी कमलाबाई चव्हाण यांचे नाव ऑनलाईन यादीतून गायब. ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष, गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार. संपूर्ण तपशील वाचा.

लोणवाडी, ता. जळगाव (प्रतिनिधी) :पंतप्रधान आवास योजनेतून मिळणाऱ्या घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून अर्ज केलेल्या लोणवाडी गावातील कमलाबाई शिवाजी चव्हाण (बेलदार) यांचे पंतप्रधान आवास योजनेच्या ऑफलाईन लाभार्थी यादीत ४१ नंबरवर नाव असताना देखील ऑनलाईन यादीतून गायब करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत लाभार्थीच्या मुलाने गटविकास अधिकाऱ्यांकडे ई-मेल द्वारे तक्रार केली आहे.

सदर प्रकरणात कमलाबाई चव्हाण यांचे नाव ऑफलाईन यादीत ‘ड’ यादीत ४१ क्रमांकावर स्पष्टपणे नमूद होते. मात्र ऑनलाईन पोर्टलवर त्यांचे नाव सापडत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी ग्रामसेवक यांच्याकडे तोंडी तक्रार केली. मात्र, ग्रामसेवकांनी “माहिती घेऊन सांगतो” असे सांगून वेळ मारून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे गरजूंना दिल्या जाणाऱ्या घरकुल योजनेत गैरव्यवहार होत असल्याचा संशय बळावत आहे.
या प्रकरणी नजरकैदचे प्रतिनिधी ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण यांना माहिती विचारली असता, त्यांनी ठोस उत्तर देण्याचे टाळत “तपासून सांगतो” असे उत्तर दिले. त्यामुळे सदर लाभार्थीने गटविकास अधिकारी जळगाव यांना ई-मेल द्वारे लेखी तक्रार केली असून, या प्रकाराची सखोल चौकशी करून अन्याय झालेल्या लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

ग्रामपंचायत – लोणवाडी (गृप ग्रामपंचायत), तालुका – जळगाव, जिल्हा – जळगाव येथील हा प्रकार असून, गरजूंना लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न ग्रामस्तरावर होत असल्याचा आरोप लाभार्थीचा मुलगा अरुण चव्हाण यांनी केला आहे.
महत्वाचे मुद्दे :
पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थीचे नाव ऑनलाईन यादीतून गायब
ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष, वेळ मारून नेण्याचा प्रयत्न
गटविकास अधिकाऱ्यांकडे ई-मेल द्वारे लेखी तक्रार
गरजू लाभार्थीवर अन्याय झाल्याचा आरोप
हे प्रकरण फक्त एका कुटुंबापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.PM Awas Yojana
सर्वाधिक बातम्या… तुम्ही वाचल्यात का?
जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”
आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय
murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!
थरकाप उडवणाऱ्या हत्येने खळबळ ;पती अडथळा ठरत होता प्रेमात?
१३ वर्षाच्या मुलीच्या पोटदुखीच्या तपासणीत उघड, अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, पालकांना धक्का!