Plane Crash news: अहमदाबाद अपघात विसरत नाही, तोवर पुन्हा एक विमान दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत ५ लहान बालकांसह सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
रशियाच्या अमूर प्रदेशात चीनच्या सीमेजवळ भीषण विमान अपघातात अंदाजे ४९ जणांचा मृत्यू भीती वर्तवण्यात येत आहे. अहमदाबाद अपघातानंतर पुन्हा विमान सुरक्षा चर्चेत आली असून विमान दुर्घटनेने सर्वत्र खळबळ उडाली.Plane Crash news

भीषण विमान अपघात: ४९ जणांचा मृत्यू
Russian Passenger Plane Crash मध्ये पुन्हा एकदा मोठा जीवितहानीचा प्रकार समोर आला आहे. रशियाच्या अमूर प्रदेशात चीनच्या सीमेजवळ Angara Airlines चं Antonov-24 प्रवासी विमान डोंगरावर कोसळलं. या अपघातात 43 प्रवासी आणि 6 क्रू सदस्यांसह सर्व 49 जणांचा मृत्यू झाला.Plane Crash news

विमान कोसळलं आणि संपर्क तुटला
टिंडा शहराजवळ कोसळलेल्या या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हवाई ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला, आणि त्यानंतर तात्काळ शोध मोहिम राबवली गेली. विमान रडारवरून गायब झाल्यानंतर 16 किमी अंतरावर डोंगरात जळालेल्या अवस्थेतील विमानाचे अवशेष आढळले.
पाच लहान मुलांसह सर्वांचा मृत्यू
या विमानात पाच लहान मुलांचा समावेश होता. एकाही प्रवाशाचा जीव वाचू शकलेला नाही, अशी माहिती स्थानिक आपत्कालीन मंत्रालयाने दिली आहे.

हवामान आणि मानवी चूक कारणीभूत?
खराब दृश्यमानतेमुळे, तसेच वैमानिकाच्या संभाव्य चुकांमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या रशियन तपास संस्थांनी चौकशी सुरू केली आहे.
अहमदाबाद अपघात विसरत नाही, तोवर पुन्हा एक विमान दुर्घटना
काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद, गुजरात येथे घडलेल्या मोठ्या विमान अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. ती धक्कादायक घटना अद्याप जनतेच्या स्मरणात असताना, पुन्हा एकदा रशियात अशी दुर्घटना घडल्याने विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

राष्ट्रव्यापी शोक आणि मदत जाहीर
या अपघातामुळे रशियात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. घटनास्थळी अद्याप बचाव आणि शोधकार्य सुरू आहे.Plane Crash news
https://x.com/Community1357/status/1948316633279115413?t=-ogI-ux_j8IZcP_8V846YQ&s=19
या महत्वाच्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?
Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या
धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय
जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”
आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय
murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!
थरकाप उडवणाऱ्या हत्येने खळबळ ;पती अडथळा ठरत होता प्रेमात?