भारतीय अर्थव्यवस्थेचे कुशल शिल्पकार व भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथील एकता फाउंडेशन सामाजिक संघटन (Reg. No. F-336) तर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.यात दैनिक एकता चे श्री.महेश गायकवाड यांना त्यांच्या सततच्या सामाजिक कार्याचा व निःस्वार्थ सेवाभावाचा गौरव म्हणून “डॉ. मनमोहन सिंह राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जय संजय रामटेके यांनी सांगितले की, “आमचं उद्दिष्ट लोकांच्या हातात कोणत्याही पक्षाचा झेंडा देणं नव्हे, तर देशाचं संविधान, शिक्षण, रोजगार, आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार देणं आहे. समाजातील प्रत्येक घटकाला निःस्वार्थपणे मदत करणे, हीच आमची ध्येयधोरणे आहेत.”या सन्मानाने दै.एकताचे श्री.महेश गायकवाड यांच्या सामाजिक कार्याला नवीन प्रेरणा लाभली असून स्थानिक पातळीवर त्यांचं अभिनंदन होत आहे.
एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जय संजय रामटेके यांच्याशी मी संपर्क करतो असतोच आणि योग्य ते मार्गदर्शन हि देत असतात आणि त्यांनी आज मनमोहन सिंह राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित केलं त्याचं मनापासून आभार
संपादक महेश गायकवाड