Pachora Married Couple Suicide News पाचोरा तालुक्यातील परधाडे गावात विवाहित प्रेमी युगलाने रेल्वेखाली आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या विरोधामुळे दोघांनी टोकाचे पाऊल उचलले. घटनेने पाचोरा हादरले वाचा सविस्तर.Pachora Married Couple Suicide News
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परधाडे गावात राहणाऱ्या विवाहित प्रेमी युगलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.Pachora Married Couple Suicide News

प्राप्त माहितीनुसार, योगेश रामदास ठाकरे (वय ३५) व मीना बबलू ठाकरे (वय २८) या दोघांमध्ये गेल्या एका वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघेही विवाहित असून, योगेशला त्याच्या पत्नीपासून तीन मुले तर मीनालाही पती बबलू ठाकरेपासून तीन मुले आहेत. एकाच गावात घराजवळ राहत असल्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, या अनैतिक संबंधांची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना झाल्यानंतर त्यांना मोठा विरोध सहन करावा लागत होता.Pachora Married Couple Suicide News
या वादांमुळे योगेश ठाकरे मागील तीन महिन्यांपासून चाळीसगाव तालुक्यातील आपल्या बहिणीकडे राहत होता. तीन दिवसांपूर्वी तो पुन्हा परधाडे येथे परत आला आणि मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोघांनी एकत्र घरातून पलायन केले. अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला, मात्र बुधवारी सकाळी रेल्वे कि. मी. खांबा क्र. ३८४/२५ या दरम्यान दोघांचे मृतदेह आढळून आले.Pachora Married Couple Suicide News
घटनेची माहिती परधाडे येथील गॅंगमनच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ पाचोरा रेल्वे स्टेशन मास्तर व नियंत्रण कक्षाला फोनद्वारे कळविले. ही घटना परधाडे ते वडगाव रेल्वेमार्गादरम्यान घडल्याने, पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भगवान चौधरी तपास करीत आहेत. घटनास्थळी पो. काॅ. योगेश पाटील, पो. काॅ. हरीश परदेशी, तसेच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार व मंगेश पाटील यांनी हजर राहून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.Pachora Married Couple Suicide News
विशेष म्हणजे, मीना ठाकरेचा पती बबलू ठाकरे यास पत्नीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तो दारूच्या नशेत असल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे अधिकच खळबळजनक वातावरण निर्माण झाले.Pachora Married Couple Suicide News
या घटनेमुळे एकाच गावात राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचे भीषण परिणीतीवर प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस याप्रकरणाचा सखोल तपास करीत असून, मृतांच्या कुटुंबियांकडून जबाब नोंदवले जात आहेत.Pachora Married Couple Suicide News