Nude party : रायपूरमध्ये स्ट्रेंजर्स हाऊस आणि पूल पार्टी प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला असून सात आयोजकांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडिया promotion द्वारे युवक-युवतींना गुप्तरित्या entry pass विकले जात होते, ज्यासाठी ४० हजार ते १ लाख रुपये आकारले जात होते. पार्टीदरम्यान drugs सेवनाचीही योजना होती. या प्रकरणी एका मंत्र्याच्या निकटवर्तीयाचे नाव पुढे आल्यानंतर राजकीय खळबळ माजली असून महिला आयोगाने पोलिसांना दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

रायपूर (छत्तीसगड) – राजधानी रायपूरमध्ये nude party, strangers house आणि pool party प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. पोलिसांनी सात आयोजकांना अटक करून मोठा पर्दाफाश केला आहे. २१ सप्टेंबरला शहरातील एसएएस फार्महाऊस येथे ही बेकायदेशीर पार्टी आयोजित होणार होती. सोशल मीडियावर गुप्तरित्या social media promotion सुरू होते.
काय होती nude party ची स्क्रिप्ट?
आयोजकांनी युवक–युवतींना विना कपडे पार्टीत सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं. Entry pass ४० हजारांपासून ते तब्बल १ लाख रुपयांपर्यंत विकले जात होते. त्याचबरोबर पार्टीत drugs चा वापरही होणार असल्याचं उघड झालं आहे. या संपूर्ण आयोजनावर तब्बल १० लाखांचा खर्च करण्यात आला होता.
पोलिसांची धडक कारवाई
या प्रकरणी हायपर क्लबचा मालक जेम्स बेक, संतोष जेवानी, अजय महापात्रा यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. संतोष गुप्ता या फार्महाऊसचा मालक असून त्याने ठिकाण उपलब्ध करून दिलं होतं. अवनीश गंगवानी याच्याकडे social media promotion ची जबाबदारी होती. Whats is Raipur या पेजवरून पोस्टर, व्हिडिओ आणि जाहिराती पसरवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने धाड टाकून सर्वांना ताब्यात घेतलं.
राजकीय संबंध उघडकीस
आयोजकांपैकी एक आरोपी हा छत्तीसगडमधील एका मंत्र्यांचा निकटवर्तीय असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे याच मंत्र्याचं नाव अलीकडेच भ्रष्टाचाराच्या प्रकरणात समोर आलं होतं. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे.
महिला आयोगाचे आदेश
या घटनेची गंभीर दखल घेत छत्तीसगड महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी रायपूर पोलीस अधीक्षक आणि सायबर सेल प्रमुखांना दोन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Nude party म्हणजे काय?
युरोप आणि अमेरिकेत nude party किंवा pool party प्रकारातील कार्यक्रम nude beach व रिसॉर्टमध्ये सामान्यपणे आयोजित होतात. मात्र भारतात अशा पार्टीला कायदेशीर परवानगी नाही. अशा पार्टीचे आयोजन करणे आणि त्यात सहभागी होणे गुन्हा ठरतो. त्यामुळे रायपूरमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणावर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.
समाजात निर्माण झालेली खळबळ
रायपूरसारख्या शहरात गुप्तरित्या nude party चे आयोजन होणं, युवक–युवतींना चुकीच्या मार्गावर ओढण्याचा प्रयत्न मानला जात आहे. नागरिकांनी अशा घटनांवर कठोर पावलं उचलण्याची मागणी केली आहे.