भडगाव प्रतिनिधी :-भडगाव शहरातील पारोळा-चाळीसगाव चौफुली येथे काल संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजे पर्यंत भडगांव पोलिसांनी कडक नाकाबंदी केली. पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू असून, संशयास्पद वाहनांची तपासणी, कागदपत्रांची पडताळणी व वाहतूक शिस्तीवर लक्ष ठेवले जात आहे.
नाकाबंदी दरम्यान दोन चाकी, चार चाकी तसेच मालवाहतूक वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात आली. असुन यात ट्रिपल शिट वाहन चालवणे, विना नंबर प्लेट वाहन, शिट बेल्ट न लावता वाहन चालवणे अशा बेशिस्त २१ वाहनांन वर कारवाई करत एकुण २८ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. भडगांव शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने व गुन्हेगारी नियंत्रणासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई भडगांव पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शना खाली ग्रेडेट पोलिस उपनिरिक्षक -आबा पाटील,पो.हे.कॉ पाडुरंग पाटील,दिपक पाटील, पो.ना मनोज माळी, ज्ञानेश्वर पाटील,सजंय पाटील,प्रविण परदेशी, निलेश ब्राम्हणकर,भुषण पाटिल यांनी केली आहे.