Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठा आरक्षण : हैदराबाद गॅझेटिअरवर आधारित पहिला GR जारी, वाचा जशाच्या तसा…

najarkaid live by najarkaid live
September 2, 2025
in Uncategorized
0
Maratha Reservation GR

Maratha Reservation GR

ADVERTISEMENT
Spread the love

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेले काही दिवस सुरु असलेल्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे निर्णय घेत पहिला अधिकृत शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला आहे.

Maratha Reservation GR
Maratha Reservation GR

या निर्णयामुळे मराठवाड्यातील पात्र मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी, कुणबी- मराठा किंवा मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने आंदोलनस्थळी भेट देत हा अंतिम मसुदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. जरांगे यांनी हा मसुदा लोकांसमोर वाचून दाखवला आणि उपस्थितांकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर लगेचच सरकारने संबंधित जीआर काढला.

२ सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या या जीआरमध्ये हैदराबाद गॅझेटिअरमधील ऐतिहासिक नोंदींचा आधार घेत मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

👇🏻 हा संपूर्ण शासन निर्णय (GR) खाली वाचा.

हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्याबाबत

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.:– सीबीसी-२०२५/प्र.क्र.१२९/मावक हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय (विस्तार), मुंबई-३२.दि.०२ सप्टेंबर, २०२५

वाचा:-

१. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २०००.

२. शासन निर्णय, क्र. सीबीसी-१४/२००१/प्र.क्र.२३२/मावक-५, दि.०१ जून, २००४.

३. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२, दि.०१ सप्टेंबर, २०१२

४. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०१८, दि.०३ जुलै, २०१८

५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. मआसु-२०२३/प्र.क्र.०३/१६-क, दि.०७ सप्टेंबर, २०२३.

६. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. मआसु-२०२३/प्र.क्र.०३/१६-क, दि.३१ ऑक्टोबर, २०२३.

७. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. मआसु-२०२३/प्र.क्र.०३/१६-क, दि.०३ नोव्हेंबर, २०२३.

८. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. मआसु-२०२३/प्र.क्र.०३/१६-क, दि. १ डिसेंबर, २०२३.

९. शासन निर्णय, क्र. सीबीसी-२०२४/प्र.क्र.०९/मावक, दि.२५ जानेवारी, २०२४.

१०. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०२४, दि.१८ जुलै, २०२४

प्रस्तावनाः –

महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे. मराठवाड्यातील सामाजिक, भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरीत महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशात प्रसिध्द आहे.

Maratha Reservation GR
Maratha Reservation GR

२. मराठवाड्यात इतिहासकालीन प्रसिध्द अशा सातवाहन राजाने राज्य केलेले आहे. पैठण (प्रतिष्ठाण) ही त्यांची राजधानी होती. यानंतर वाकाटक, चालुक्य, यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केले आहे. देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राजांच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतिक म्हणून आज सुध्दा त्याच दिमाखाने उभा आहे. अशा या अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृध्द वारसा असणारा मराठवाडा दि.१७ सप्टेंबर, १९४८ साली भारतात विलीन झाला. या काळात या संतभूमितून औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, परळी-वैजनाथ, माहूरगड, तुळजापूर, पैठण, आपेगाव, नरसी नामदेव व तेर अशी समृध्द तिर्थक्षेत्रे

निर्माण झाली. जगभरात प्रसिध्द असणारे आणि वैविध्यपूर्ण कलाशिल्पाने नटलेले अजिंठा व वेरूळ येथील लेणी आहेत.

३. मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमितून संतश्रेष्ठ नामदेव, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, गोरा कुंभार, जनाबाई, जगमित्र नागा, एकनाथ, सेना न्हावी व जनार्दन स्वामी अशा महनीय संतांनी या भूमिमध्ये सहिष्णुता, भागवत धर्माचा प्रसार, भूतदया, समानतेचा संदेश दिला आहे. तसेच श्री गुरू गोविंद सिंघजी यांची समाधी नांदेड येथे असून त्याठिकाणी शीख धर्मीय मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात. या कारणाने मराठवाड्यात आजसुध्दा सर्व धर्म समभावाची वीण कायम आहे. मराठवाड्यातून मुख्यतः गोदावरी, पूर्णा व मांजरा या नद्या वाहतात. या नद्याने यांतील जनजीवन काही प्रमाणात समृध्द केले आहे. गोदावरी ही महाराष्ट्राची जीवनदायिनी असून मोठ्या प्रमाणात नागरी समूह या नदीच्या तिरावर वसलेला आहे.

४. असा हा मराठवाडा महाराष्ट्रात दि. ०१ नोव्हेंबर, १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि दि.०१ मे, १९६० पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला आहे. तत्कालिन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती. अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पध्दतीमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते. या संपन्न अशा मराठवाड्यात अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलने सुरू झाली आहेत. त्यासाठी या भागातील कुणबी, कुणबी मराठा तसेच मराठा- कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागातील सदरहू जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने दि.०७ सप्टेंबर, २०२३ रोजी मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये नोंदी शोधण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. समितीने मराठवाड्यातील विविध शासकीय कार्यालयातील उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणात नोंदी शोधल्या आहेत. उक्त समितीमार्फत मराठवाड्यात जिल्हानिहाय भेटी/दौरे करून बैठका घेण्यात आल्या. आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी याकारणाने समितीने दोन वेळा हैदराबाद येथील पुराभिलेख विभागास आणि महसूल विभागास भेटी देऊन सुमारे ७ हजार पेक्षा अधिकची कागदपत्रे अभ्यासाकरिता प्राप्त करून घेतली आहेत. तसेच, देशाची जनगणना आणि त्याअनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याकरिता दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि त्यांच्या ग्रंथालयास भेट देऊन अधिकची कागदपत्रे उपलब्ध करून घेतली आहेत. याचदरम्यान दिल्ली येथील राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयात भेट देऊन तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्रे जी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यासाठी उपयोगी ठरतील ती कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही केलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने गेल्या दोन वर्षात सातत्याने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याकरिता मोठ्या प्रमाणात क्षेत्रिय यंत्रणेमार्फत कार्यवाही केलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने आतापर्यंत विविध शिफारशीसह सादर केलेल्या अहवालांमधील सर्व शिफारशी शासनाने स्विकारल्या आहेत व याआधारे विविध विभागामार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे. यापुढेही सदर समितीने दिलेल्या अहवालांवर योग्य कार्यवाही केली जाणार आहे.

4. तथापि, मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी-मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्रे मिळण्याकरिता हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीस हैदराबाद, सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निदेशित करण्यात आले असून, त्याकरिता उक्त समितीस दि.३१ डिसेंबर, २०२५ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील पाच जिल्ह्यांची (औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड व उस्मानाबाद) माहिती प्राप्त करून घेतली आहे व सदरहू कागदपत्रांचा अभ्यास करण्यात येत आहे. तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाई, त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता. या कागदपत्रांमध्ये / गॅझेटिअरमध्ये (सन १९२१ व सन १९३१) कुणबी/कापू अशा नोंदी आहेत. यापुर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,

Maratha Reservation GR
Maratha Reservation GR

भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० च्या कलम १८ च्या पोट कलम १ मध्ये आणि नियम, २०१२ च्या नियम ४ मधील उप-नियम (२) मधील खंड (च) मध्ये (च) नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरिता अधिसूचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०२४, दि.१८ जुलै, २०२४ अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, मराठा समाजास कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यास उपयोग झालेला आहे. आता, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी, याकरिता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

संदर्भाधीन वाचा क्र.१ व क्र.३ अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत कार्यपध्दती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करुन सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गावपातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे: –

समिती सदस्यः – १. ग्राम महसूल अधिकारी

२. ग्रामपंचायत अधिकारी

३. सहायक कृषी अधिकारी

मराठा समाजातील भुधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दि.१३.१०.१९६७ पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे.

या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील / कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील/कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गावपातळीवरील स्थानिक समिती, वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(वर्षा देशमुख)

सही

उप सचिव, महाराष्ट्र शासन

 

Maratha Reservation GR
Maratha Reservation GR
Maratha Reservation GR
Maratha Reservation GR


Spread the love
Tags: #GRIssued#HyderabadGazette#KunbiReservation#MaharashtraPolitics#ManojJarangePatil#MarathaKunbiCertificate#MarathaReservation#Marathwada
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

Related Posts

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

September 2, 2025
Cyber crime : जळगावात उघडकीस आले ‘सायबर’ रॅकेट !

Cyber crime : जळगावात उघडकीस आले ‘सायबर’ रॅकेट !

September 2, 2025
US job market crisis: 1.5 lakh Indian graduates face uncertainty

US jobs crisis: 1.5 लाख भारतीय पदवीधर विद्यार्थी बेरोजगार होण्याच्या उंबरठ्यावर ; अमेरिकेत नोकऱ्या धोक्यात!

September 1, 2025
मे उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारपुढे पेच कायम ! मराठा आरक्षण आंदोलन

मे उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारपुढे पेच कायम ! मराठा आरक्षण आंदोलन

September 1, 2025
NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

September 1, 2025
Apply Online Now | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ : आता 100+ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु

Apply Online Now | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ : आता 100+ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु

September 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maratha Reservation GR

मराठा आरक्षण : हैदराबाद गॅझेटिअरवर आधारित पहिला GR जारी, वाचा जशाच्या तसा…

September 2, 2025
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

September 2, 2025
Cyber crime : जळगावात उघडकीस आले ‘सायबर’ रॅकेट !

Cyber crime : जळगावात उघडकीस आले ‘सायबर’ रॅकेट !

September 2, 2025
US job market crisis: 1.5 lakh Indian graduates face uncertainty

US jobs crisis: 1.5 लाख भारतीय पदवीधर विद्यार्थी बेरोजगार होण्याच्या उंबरठ्यावर ; अमेरिकेत नोकऱ्या धोक्यात!

September 1, 2025
मे उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारपुढे पेच कायम ! मराठा आरक्षण आंदोलन

मे उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारपुढे पेच कायम ! मराठा आरक्षण आंदोलन

September 1, 2025
NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

September 1, 2025
Load More
Maratha Reservation GR

मराठा आरक्षण : हैदराबाद गॅझेटिअरवर आधारित पहिला GR जारी, वाचा जशाच्या तसा…

September 2, 2025
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

September 2, 2025
Cyber crime : जळगावात उघडकीस आले ‘सायबर’ रॅकेट !

Cyber crime : जळगावात उघडकीस आले ‘सायबर’ रॅकेट !

September 2, 2025
US job market crisis: 1.5 lakh Indian graduates face uncertainty

US jobs crisis: 1.5 लाख भारतीय पदवीधर विद्यार्थी बेरोजगार होण्याच्या उंबरठ्यावर ; अमेरिकेत नोकऱ्या धोक्यात!

September 1, 2025
मे उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारपुढे पेच कायम ! मराठा आरक्षण आंदोलन

मे उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारपुढे पेच कायम ! मराठा आरक्षण आंदोलन

September 1, 2025
NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

September 1, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us