महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये आरोग्य, परिवहन, महसूल, गृहनिर्माण आणि गृह अशा विविध विभागांतील धोरणात्मक पावले उचलण्यात आली आहेत. यामुळे रुग्णालयांच्या सुविधेत वाढ, नागरिकांना स्वस्त व सुलभ घरांचा लाभ, रेल्वे मार्गाचा विकास, तसेच पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे.
गर्भपाताच्या गोळीने १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाला अटक
हे आहेत आज घेतलेले महत्त्वाचे निर्णय
(आरोग्य विभाग)
राज्यातील शासकीय रुग्णालयांचे सक्षमीकरण करण्यासाठी आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी उपलब्ध होणार.
महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना अंतर्गत रुग्णांच्या उपचार दाव्यांमधून मिळणाऱ्या निधीचा योग्य विनियोग करण्यास मान्यता.
(परिवहन विभाग)
नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेज रुपांतरण प्रकल्पाला गती देण्यात आली.
१९६.१५ कि.मी. लांबीच्या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करण्यासाठी ४९१ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद.
(महसूल विभाग)
अकोल्यात शहर बस स्थानक, भाजी बाजार आणि वाणिज्य संकुलासाठी महापालिकेला २४,५७९.८२ चौ.मी. जागा हस्तांतरित.
सोलापूरच्या कुंभारी गावात महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेला बांधलेल्या घरांसाठी मुद्रांक व नोंदणी शुल्कात सवलत.
वसई- विरार महापालिकेला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आचोळे (जि. पालघर) येथे जमीन देण्यास मंजुरी.
महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिक रोड शाखेला मौजे देवळाली (जि. नाशिक) येथील १०५५.२५ चौ.मी. जागा देण्यात मान्यता.
(गृह विभाग)
मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बेकायदेशीर होर्डिंग दुर्घटनेवरील चौकशी अहवाल स्वीकारण्यात आला.
समितीच्या शिफारशींवर आधारित उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांना एका महिन्याची मुदत.
(गृहनिर्माण विभाग)
मुंबईतील अंधेरी येथील एसव्हीपी नगरमधील सामुहिक पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी.
या प्रकल्पाअंतर्गत १२२ संस्था व ३०७ वैयक्तिक भूखंडावरील ४,९७३ सदनिका पुनर्विकसित होणार.