जळगाव (नजरकैद न्यूज) : जळगाव महापालिका निवडणुकीत तरुणाईला संधी मिळावी अशी अपेक्षा जळगावकरांकडून व्यक्त होत असतांना मानसी रंजित भोईटे यांचेही नाव चर्चेत आले आहे. सासूबाई आणि माजी महापौर लताताई भोईटे व पती रंजित भोईटे यांनी प्रभाग क्रमांक ८ मध्ये गेल्या पाच वर्षांत तब्बल ३० कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. रस्ते, गटारी आणि पाणीपुरवठा या मूलभूत गरजा पूर्ण करतानाच, भोईटे कुटुंबाने शहराच्या सौंदर्यीकरणाकडेही लक्ष दिले आहे. हाच विकासाचा ‘ब्लूप्रिंट’ घेऊन मानसी आता मैदानात उतरल्या आहेत.

उच्चशिक्षित चेहरा
‘होम सायन्स’ विषयातील पदवीपासून ते आधुनिक काळातील अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘डिजिटल मार्केटिंग’ पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांचे शिक्षण आणि कौशल्ये केवळ पदवीपुरते मर्यादित नसून, त्यांनी ‘योग शिक्षण पदविका’, ‘बाल संस्कार योग प्रशिक्षण’ आणि ‘आंतरराष्ट्रीय न्यूट्रिशन कोच’ म्हणूनही नैपुण्य मिळवले आहे. थायलंड (बँकॉक) येथे त्यांना ‘ग्लोबल वुमन अवॉर्ड २०२४’ ने सन्मानित करण्यात आले आहे, जे त्यांच्या जागतिक स्तरावरील कार्याची पावती देते.
विकासाचा ३० कोटींचा वारसा
मानसी भोईटे या जळगावच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका लताताई भोईटे आणि रंजित भोईटे यांचा वारसा पुढे चालवत आहेत. लताताई भोईटे यांनी आपल्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक ८ मध्ये तब्बल ३० कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. यामध्ये रस्ते, गटारी, कॉंक्रिटीकरण आणि पाणीपुरवठा यांसारख्या पायाभूत सुविधांचा समावेश आहे. हाच विकासाचा वारसा आता मानसी भोईटे अधिक सक्षमपणे आणि आधुनिक दृष्टीकोनातून पुढे नेण्यासाठी सज्ज आहेत.
सामाजिक बांधिलकी आणि विकासकामे
नागरिकांच्या भोईटे कुटुंबाने नेहमीच समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. भोईटे कुटुंबाच्या पाठबळाने अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लागले आहेत. भोईटे नगर उड्डाणपुलासाठी लागणारी जागा रेल्वेला देऊन प्रलंबित प्रश्न त्यांनी सोडवला, ज्यामुळे १ लाख लोकांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटला. नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असा ‘ऑक्सिजन पार्क’ विकसित केला. तरुणांच्या आणि जेष्ठांच्या आरोग्यासाठी प्रभागातील मोकळ्या भूखंडांचे सुशोभीकरण करून तिथे ओपन जिम उभारल्या. गरजू कुटुंबांना ‘घरकुल योजनेचा’ लाभ मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे.









