Police Compassionate Recruitment Maharashtra राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यआराखड्यांतर्गत पोलिस विभागातील अनुकंपा नियुक्त्या मिशन मोडवर राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत जाहीर केले आहे. Police Compassionate Recruitment Maharashtra

Police compassionate recruitment Maharashtra, Devendra Fadnavis police reforms, Maharashtra 150-day plan police, 8-hour police duty, Maharashtra police housing scheme, police health checkup, police mental wellness program, DG Loan Scheme, police weekly offs, Maharashtra police welfare, suicide in police, stress management in police
राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यआराखड्यांतर्गत पोलिस विभागातील अनुकंपा नियुक्त्या मिशन मोडवर राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत जाहीर केले आहे. राज्यात मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी सेवेतील कालावधीत मृत्युमुखी पडतात. त्यांच्या वारसांना न्याय देण्यासाठी अनुकंपा भरती महत्त्वाची ठरते. त्यामुळे सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेश सर्व संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.Police Compassionate Recruitment Maharashtra
विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या सेवेतील विविध सुधारणा, गृहनिर्माण, मानसिक व शारीरिक आरोग्य तसेच सेवासुविधांविषयी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, पोलिसांची सेवा अधिक सुदृढ व कार्यक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.Police Compassionate Recruitment Maharashtra
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबईत सर्वप्रथम 8 तासांच्या ड्युटीची अंमलबजावणी करण्यात आली आणि ती आता राज्यभर लागू झाली आहे. उत्सव, बंदोबस्त किंवा आपत्कालीन परिस्थितीत काही वेळा अपवाद असले तरी, एकूणच पोलीस कर्मचारी 8 तासांच्या शिफ्टमध्ये काम करत आहेत. याशिवाय, साप्ताहिक सुट्टीही लागू करण्यात आली असून, विशेष कारणास्तव न मिळाल्यास त्याच्या मोबदल्यात ‘एनकॅशमेंट’ची रक्कम वाढवण्यात आली आहे.Police Compassionate Recruitment Maharashtra
गृहनिर्माणाच्या संदर्भातही मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवले जात आहेत. नवी मुंबईत 10 हजार सदनिकांचा प्रकल्प सुरू असून, पोलिसांसाठी सहकारी गृहनिर्माण संस्था उभारणाऱ्यांना शासनाकडून विशेष सहाय्य दिले जात आहे. तालुका व जिल्हा स्तरावरही अशा योजना गतिमानपणे सुरू आहेत.
डीजी लोन योजना, जी मागील सरकारच्या काळात थांबली होती, ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पोलीस कर्मचारी आपल्या घरासाठी विशेष कर्ज घेऊ शकतात. मागील बॅकलॉग पूर्ण करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.Police Compassionate Recruitment Maharashtra
मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. 40 वर्षांवरील पोलिसांसाठी वर्षातून एकदा आणि 50 वर्षांवरील पोलिसांसाठी वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, संवाद सत्रे व योगा, ध्यानधारणा शिबीरे आयोजित केली जात आहेत.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भात सांगितले की, गेल्या काही वर्षांत हृदयविकार, कर्करोग व आत्महत्यांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाल्याचे आढळले आहे. कार्डियाक अरेस्टमुळे 75, कर्करोगामुळे 6, तर आत्महत्येची 25 प्रकरणे समोर आली आहेत. यात कुटुंबीय वाद, मानसिक तणाव आणि डिप्रेशन यासारखी कारणे आढळली.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 40 प्रकारच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार देण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी राज्यभरातील 270 हॉस्पिटल्सशी करार करण्यात आले आहेत. टाटा मेमोरियल व ए.के. मेहता संस्थांच्या सहकार्याने कॅन्सर तपासणी शिबीरेही घेण्यात येत आहेत.
सरकार पोलिसांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या सेवेला प्रतिष्ठा मिळावी, तणावमुक्त वातावरणात ते कर्तव्य बजावावं, यासाठी शासन स्तरावर अनेक सुधारणा व उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत.
I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय