जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील वावडदा येथे आज हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह – अपराजित योद्धा व भारतमातेचा महान सुपुत्र यांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, जळगावचे आदर्श उद्योजक व समाजभूषण पुरस्कार प्राप्त तसेच महाराणा प्रतापसिंह स्मारक समिती अभियान समिती भारतचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. प्रवीणसिंह पाटील राजपूत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्याला क्षत्रिय कुशवाह समाज बांधव, महाराणा प्रतापसिंह स्मारक समिती वावडदा चे अध्यक्ष-उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग पदाधिकारी विलाससिंह पाटील, विठ्ठलसिंह मोरे, भगवानसिंह खंडाळकर, वैभव मोरे, रोशनसिंह राजपूत, सामाजिक नेते दिलीपसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या अनावरण प्रसंगी ग्रामस्थांनी महाराणा प्रतापसिंहांच्या पराक्रमाची आठवण करून दिली आणि त्यांचे जीवनचरित्र भावी पिढीस प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमामुळे वावडदा ग्रामस्थांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली असून राजपूत समाजाच्या ऐक्याची सशक्त जाणीव प्रकर्षाने अधोरेखित झाली.