जळगाव / हनुमानगड (राजस्थान) : देशातील सर्वात मोठ्या राजपूत युवा संघटनांपैकी एक असलेल्या श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना (एकीकृत राजपूत युवा संगठन भारत) यांनी महाराष्ट्रात मोठा निर्णय घेतला आहे. प्रवीणसिंह जी राजपूत यांची महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण राज्यभरातून अबिनंदनाचा वर्षाव होतं आहे.
१७ ऑगस्ट २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार त्यांचा कार्यकाळ १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत (एक वर्ष) राहणार आहे. या कालावधीत ते महाराष्ट्र राज्यातील संघटनेची धुरा सांभाळणार असून संघटनेच्या कार्याचा प्रसार व बळकटीसाठी ते पूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेड़ी, कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष शीला सुखदेवसिंह गोगामेड़ी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेन्द्रसिंह कटार यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
संघटनेने जारी केलेल्या पत्रानुसार, पदाच्या गौरव आणि जबाबदाऱ्या सांभाळून प्रवीणसिंह राजपूत संघटनेची ताकद वाढवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
“धर्मो रक्षति रक्षितः” या ब्रीदवाक्याखाली करणी सेना कार्यरत असून, महाराष्ट्रात नव्या जोमाने संघटन उभारणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.