पाळधी ता, धरणगाव– येथे खान्देशातील पारंपरिक आणि भावनिक अधिष्ठान असलेल्या कानबाई उत्सवाची सोमवारी (दि.4) मोठ्या उत्साहात सांगता झाली. डीजे, च्या तालावर तसेच पारंपरिक वाद्यांच्या सुरावटीवर नृत्य करत आणि फुगडी खेळत महिलांनी कानबाईचे विसर्जन केले.
प्रसंगी मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी यांनी कानबाई मातेचे दर्शन घेत खानदेशवासीयांना सुख-समृद्धी यश प्राप्ती दे असे साकळे घातले
प्रतापराव पाटील यांच्यासह उद्योजक संजय खैरनार , उद्योजिका नूतन खैरनार,पत्रकार भूषण महाजन सहपरिवार उपस्थित होते.
नागपंचमीच्या नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाईची स्थापना केली जाते आणि त्यानंतर सोमवारी विसर्जन मिरवणूक काढली जाते. यावर्षीही पाळधी येथे पारंपरिक उत्साह, भक्तीभाव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्सव साजरा झाला.
खान्देशाचा सांस्कृतिक मोठा उत्सव
कानबाई उत्सव हा जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी एक महत्त्वाचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे. श्रीकृष्णाच्या सख्या मानल्या जाणाऱ्या राधिका (कानबाई) आणि चंद्रावली/रुक्मिणी (रानबाई) यांच्या पूजेसाठी समर्पित असलेला हा उत्सव श्रद्धेने साजरा केला जातो.
धार्मिक आणि भावनिक महत्त्व
कानबाई आणि रानबाई या नवसाला पावणाऱ्या देवता मानल्या जातात. स्त्रिया त्यांच्याशी मैत्रीभावाने संवाद साधतात, त्यांच्याकडे सुख, समृद्धी, संतती आणि संकटनिवारणासाठी प्रार्थना करतात.
भारतीय संस्कृतीची जपणूक
उत्सवात अहिराणी गीतांचा गोडवा, फुगडी, नृत्य, भजन-कीर्तन, जागरण, आणि खास रोट (पुरणपोळी) यांचा समावेश असतो. या परंपरा खान्देशी ओळख जपतात. यानिमित्त घरोघरी भाऊबंदकी एकत्र नांदते
हजारो वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव मौखिक साहित्य आणि लोककथांचा ठेवा जपतो. महिलांचे सक्रीय सहभागातून सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतो.