Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील आजच्या २० महत्वाच्या बातम्या वाचा – Top 20 Jalgaon News Today

najarkaid live by najarkaid live
July 18, 2025
in जळगाव
0
Jalgaon News Today

Jalgaon News Today

ADVERTISEMENT
Spread the love

 Jalgaon News Today:  जळगाव जिल्ह्यातील आजच्या २० महत्वाच्या घडामोडी, राजकारण, बाजारभाव, गुन्हेगारी व हवामानाशी संबंधित बातम्या वाचा.Jalgaon News Today

 

 

भुसावळ येथे लोकशाही दिनाचे आयोजन – जनतेच्या तक्रारींचे तात्काळ : निरसन करण्यासाठी शासनाची प्रभावी योजना

जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी)- सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांचे तात्काळ निरसन करण्यासाठी शासनामार्फत प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या अंतर्गत नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ व न्याय्य तोडगा मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच मंत्रालय स्तरावरही हा दिन साजरा केला जातो.  प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

Jalgaon News Today
Jalgaon News Today

  त्या अनुषंगाने दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता तहसील कार्यालय भुसावळ येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुढेही दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसीलदार भुसावळ यांच्या दालनात हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार आहे.

 

 तरी नागरिकांनी या दिवशी हजर राहून स्वतःच्या तक्रारींचे निवेदन सादर करून त्या तक्रारींचे तात्काळ निरसन करून घ्यावे, असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000000000

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेस गती : त्रुटीपूर्ण अर्ज तत्काळ सुधारण्याचे आवाहन

  जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी)  – जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून त्रुटीपूर्ण अर्जांवरील कार्यवाहीला अडथळा येत असून, अनेक विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळेवर त्रुटींची पूर्तता न केल्यामुळे अर्ज रखडले आहेत. अर्जदारांनी समितीकडून एसएमएस, ई-मेल वा लेखी पत्राच्या माध्यमातून सूचना मिळूनही कार्यालयाशी संपर्क साधलेला नाही, असे निरीक्षण समितीकडून नोंदविण्यात आले आहे.Jalgaon News Today

                 या पार्श्वभूमीवर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा सौ. नयना बोंदार्डे, उपायुक्त राकेश महाजन व संशोधन अधिकारी नंदा रायते यांनी स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांनी व पालकांनी तातडीने समिती कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक त्या त्रुटींची पूर्तता करावी, जेणेकरून समितीला निर्णय घेणे शक्य होईल.

Jalgaon News Today
Jalgaon News Today

              महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यासाठी बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था), पुणे यांच्यामार्फत विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

               १ ऑगस्ट २०२० पासून ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात आली असून, १२ डिसेंबर २०२० पासून सेवा शुल्क भरण्यासाठी पेमेंट गेटवेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना आपला अर्ज, स्थिती व प्रमाणपत्र कुठेही व कधीही मोबाईलद्वारे पाहण्याची सुविधा आहे. तसेच, समितीकडून निकाल लागल्यानंतर वैध प्रमाणपत्र थेट ई-मेलद्वारे पाठवले जाते.

              विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हेल्पडेस्क, SMS व ई-मेलद्वारे त्रुटींची माहिती देण्यात येत आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी त्रुटीची पूर्तता तात्काळ करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी केले आहे.

केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

  जळगाव, दि. १८ जुलै (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) तात्काळ सादर करावे, असे आवाहन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.Jalgaon News Today

                यामध्ये  इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना,  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना यांसारख्या केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की, त्यांनी आपले डिजिटल हयात प्रमाणपत्र (DLC) तयार करून संबंधित पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.

Jalgaon News Today
Jalgaon News Today

                 यासाठी केंद्र शासनाने ‘बेनिफिशियरी सत्यापन अ‍ॅप (Beneficiary Satyapan App)’ विकसित केले असून ते Google Play Store वर अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईलसाठी उपलब्ध आहे. हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसरावी:

  1. ‘आधार फेसआरडी’ (Aadhaar FaceRD) अ‍ॅप Google Play Store वरून डाउनलोड करा.
  2. ‘बेनिफिशियरी सत्यापन’ (Beneficiary Satyapan) अ‍ॅप डाउनलोड करून डिव्हाइस नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  3. लाभार्थ्याने आधार क्रमांक, मोबाईल नंबर व OTP च्या माध्यमातून चेहरा, बोटांचे ठसे किंवा डोळ्यांची पडताळणी करून हयात प्रमाणपत्र तयार करावे.
  4. प्रमाणपत्र यशस्वीरित्या तयार झाल्यावर NSPT पोर्टलवर आपोआप अपलोड होईल व SMS द्वारे पुष्टी मिळेल.

 लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून आपले हयात प्रमाणपत्र सादर करावे, असे आवहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

000000000000

माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कारासाठी’ अर्ज करण्याचे आवाहन

 जळगाव, दि. १८ जुलै (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, त्यांची पत्नी तसेच पाल्य यांना सैनिक कल्याण विभाग, पुणे मार्फत दिला जाणारा “विशेष गौरव पुरस्कार” देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध क्षेत्रांत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांचा गौरव करण्याचा हेतू या पुरस्कारामागे आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी खालील पात्रतेच्या आधारे अर्ज मागविण्यात येत आहेत:

            देश, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा वाढवणारे उल्लेखनीय कार्य करणारे माजी सैनिक/पत्नी/. पाल्य , इ. १० वी मध्ये ९०% व त्यापेक्षा अधिक गुण व १२ वी मध्ये ८५% व त्याहून अधिक गुण प्राप्त केलेले पाल्य.Jalgaon News Today

सदर पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींनी आपले अर्ज दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत, असे आवाहन मेजर (डॉ.) निलेश प्रकाश पाटील (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.

000000000000

जिल्ह्यातील आठ तलाव मासेमारी ठेक्याने देणार – ई-निविदा प्रक्रिया सुरू

  जळगाव, दि. १८ जुलै (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आठ तलाव आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी (२०२५-२६ ते २०२९-३०) मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येत असून, यासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Jalgaon News Today
Jalgaon News Today

या ठेक्याच्या अधीन येणाऱ्या तलावांची यादी पुढीलप्रमाणे आहे –

१) मोर (९६.०० हेक्टर),

२) को.प. बंधारा (४४.९७ हेक्टर),

३) शहापूर (४७.०० हेक्टर),

४) खडकेसिम (३०.०० हेक्टर),

५) लोणीसिम (३५.३६ हेक्टर),

६) शेळावे (२७.०० हेक्टर),

७) दहिगाव बंधारा (२३९.०० हेक्टर)

आणि ८) शिरसमणी (७३.०० हेक्टर).

            या तलावांच्या मासेमारी ठेक्यासाठी सविस्तर माहिती आणि अटी http://mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, सहकारी संघ, मच्छीमार, मत्स्य संवर्धक, खाजगी उद्योजक किंवा वैयक्तिक व्यक्तींनी सदर संकेतस्थळावरून ई-निविदा सादर कराव्यात, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), जळगाव अ.रा. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

00000000000

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा 20 जुलै ते 21 जुलै पर्यंत जळगाव जिल्हा दौरा

        जळगाव, दि. 18 जुलै (प्रतिनिधी)- केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे या जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर येत असून तो खालील प्रमाणे.रविवार, दिनांक 20 जुलै, 2025 रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मुक्ताईनगरकडे प्रयाण. १०:३० वाजता मुक्ताईनगर, जळगाव येथे येथे आगमन. मुक्ताईनगर येथे मुक्कामी.  सकाळी ११ ते  ३.००  वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासी शिबिर कार्यालयात शासकीय कामकाज . रात्रीचा मुक्काम मुक्ताईनगर.

                सोमवार, दिनांक 21 जुलै, 2025 , रोजी  पहाटे 03:00 वाजता मुक्ताईनगरहून मोटारीने  छत्रपती संभाजीनगरकडे रवाना.

०००००००००००

वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, यांचा जळगाव जिल्हा दौरा

        जळगाव, दि.18 जुलै (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांचा जळगाव जिल्ह्याचा शासकीय दौरा शनिवार, दिनांक १९ जुलै २०२५ रोजी पुढील प्रमाणे. शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून रेल्वेने भुसावळकडे प्रयाण करतील.

             सकाळी ०७.१५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन. शासकीय मोटारीद्वारे भुसावळ येथील निवासस्थानी  सकाळी ०७.३० वाजता आगमन.

 

ज्येष्ठांचा सन्मान –कायद्याने हक्क,प्रशासनाची हमी!”

▪‘पालक देखभाल व कल्याण अधिनियम, २००७’ची जळगाव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

        जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) – आई-वडिलांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या पिढीने त्यांच्या उतारवयात पाठ फिरवू नये, या उद्देशाने केंद्र शासनाने लागू केलेल्या ‘पालक देखभाल व कल्याण अधिनियम, २००७’ कायद्याची महाराष्ट्र शासनाने प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यातही हा कायदा प्रभावीपणे राबवण्यात येत असून, अनेक वृद्ध पालकांना त्यातून मानसिक आधार व कायदेशीर हक्क मिळू लागले आहेत.Jalgaon News Today

वृद्धत्वाला आधार – कायद्याचं बळ

            या कायद्यानुसार, वृद्ध आईवडिलांना त्यांच्या मुलांनी निवास, अन्न, औषधोपचार व मानसिक आधार देणे हे कायदेशीर बंधनकारक आहे. जबाबदारी झटकणाऱ्या मुलांविरोधात पालकांना जिल्हा न्यायप्रविष्टा अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते. अशा प्रकरणांमध्ये दरमहा १०,००० रुपयांपर्यंत देखभाल भत्ता मिळवून देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. इतकंच नव्हे, तर संपत्तीच्या फसवणुकीच्या प्रकरणात, न्यायालयाच्या आदेशाने वृद्धांचा हक्क परत मिळवून देण्याचीही तरतूद आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा संदेश

            “पालकांचं सहजीवन हे तुमचं सौभाग्य आहे, ओझं नव्हे! मालमत्ता हक्काने मिळवायची असेल, तर जबाबदारीही निसंकोचपणे स्वीकारा. वृद्धांना त्यांच्या उतारवयात आधार देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे – मुलं म्हणून, नागरिक म्हणून आणि अधिकारी म्हणूनही…”

            जिल्हा प्रशासन सजग असून, प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर त्वरित कारवाई करून अनेक ज्येष्ठांना न्याय मिळवून देण्यात आला आहे.

हक्कांसाठी एक फोन – हेल्पलाईन 14567

            ज्येष्ठ नागरिकांना माहिती, सल्ला आणि सहाय्य मिळावे यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 14567 सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून, कायद्याविषयी मार्गदर्शन, तक्रार प्रक्रिया आणि स्थानिक यंत्रणांशी संपर्क साधता येतो.

जळगाव जिल्हा प्रशासनाचे आवाहन:

            “ज्येष्ठ नागरिकांनो, आवाज द्या – गप्प राहू नका! तुमच्या हक्कांसाठी कायद्याचा आधार घ्या. जळगाव जिल्हा प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.”

००००००००००

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा

            जळगाव, दि. 18 जुलै (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांचा आज, शुक्रवार दिनांक  18 जुलै, 2025  रोजी जळगाव जिल्हा दौरा होत आहे.

       शुक्रवार दिनांक 18 जुलै, 2025 रोजी सायंकाळी 07.55 वाजता मुंबई विमानतळ येथून विमानाने जळगाव कडे प्रयाण.  रात्री 09.15 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगांव जि. जळगाव कडे प्रयाण. रात्री 08.50 वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगांव जि. जळगाव कडे प्रयाण. रात्री 09.45 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगाव येथे आगमन व राखीव.

००००००००००

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा —

प्रथम पारितोषिक ₹५ लाख

            जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या मंडळास तब्बल ₹५ लाखांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

                  स्पर्धेसाठी राज्यभरातील नोंदणीकृत किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. २० जुलै ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. स्पर्धा पूर्णतः निःशुल्क आहे. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

            या स्पर्धेत मंडळांनी राबवलेले सांस्कृतिक उपक्रम, पर्यावरणपूरक सजावट व मूर्ती, सामाजिक जनजागृती कार्यक्रम, ध्वनीप्रदूषणविरोधी उपाययोजना, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे संवर्धन इत्यादी विविध निकषांवर परीक्षण केले जाणार आहे.

                गणेशोत्सव काळात, २७ ऑगस्टपासून, जिल्हाधिकारी कार्यालयांनी नियुक्त केलेल्या समित्यांमार्फत जिल्हास्तरावरील परीक्षण करण्यात येईल. मुंबई, उपनगर, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ तर उर्वरित ३२ जिल्ह्यांतून प्रत्येकी १ अशा एकूण ४४ मंडळांची शिफारस राज्यस्तरीय परीक्षणासाठी केली जाईल.

             राज्यस्तरावरील अंतिम विजेत्यांना खालीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत. यात प्रथम क्रमांक – ₹५,००,००० व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक – ₹२,५०,००० व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक – ₹१,००,००० व प्रमाणपत्र, इतर जिल्हास्तरीय विजेते – ₹२५,००० व प्रमाणपत्र.

           या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे. स्पर्धेची सविस्तर माहिती व अर्जाची लिंक संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमध्येही उपलब्ध आहे.

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 11 कोटींचा परतावा

जळगाव : महावितरणकडे जमा असलेल्या वीजबिलांच्या सुरक्षा ठेवीवर जळगाव परिमंडलातील 11 लाख 50 हजार 996 लघुदाब वीजग्राहकांना 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 11 कोटी 6 लाख रुपये व्याज देण्यात आले आहे. ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आली आहे.

Jalgaon News Today
Jalgaon News Today

          जळगाव मंडलातील 7 लाख 20 हजार 747 ग्राहकांना 6 कोटी 73 लाख रुपये, धुळे मंडलातील 3 लाख 8 हजार 994 ग्राहकांना 3 कोटी 6 लाख रुपये तर नंदुरबार मंडलातील 1 लाख 21 हजार 255 ग्राहकांना 1 कोटी 27 लाख रुपये व्याज देण्यात आले आहे. सुरक्षा ठेव म्हणजे काय? दरवर्षी ती का घेतली जाते? त्यावर व्याज मिळते का? असे एक नाही तर असंख्य प्रश्न सामान्य वीजग्राहकाला नेहमीच पडत असतात. मुळात महिनाभर वीज वापरल्यानंतर ग्राहकांना महावितरण वीजबिल देते. ते भरण्यासाठी 21 दिवसांची मुदत देते. मुदत संपल्यानंतरही बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यासाठी 15 दिवसांची नोटीस देते. हा सर्व कालावधी दोन महिन्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार हमी म्हणून ग्राहकांकडून मागील वार्षिक वीजवापराच्या सरासरी दुप्पट तसेच त्रैमासिक बिलिंग असलेल्या ग्राहकांची सुरक्षा ठेव दीडपट करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

महावितरण वर्षातून एकदा वीजवापराच्या अनुषंगाने सुरक्षा ठेवीचे पुनर्निर्धारण करू शकते. एखाद्या ग्राहकाची सुरक्षा ठेव ही त्याच्या आर्थिक वर्षातील दोन महिन्याच्या सरासरी रकमेपेक्षा कमी असेल तर संबंधित ग्राहकाला अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिले जाते. ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीजदर आणि वीजवापर यामुळे वीजबिलाची रक्कम वाढली असेल तरच त्यातील फरकाच्या रकमेचे बिल म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल  ‍जाते. ज्या ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा महावितरणकडे भरणा केला नसेल त्यांची ती थकबाकी सुरक्षा ठेवीतील व्याजामधून वळती करण्यात येते. ग्राहकांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे व्याज देण्याचेही विद्युत नियामक आयोगाचे निर्देश आहेत.

महावितरणकडे जमा असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम असून वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करताना ही ठेव ग्राहकाला व्याजासह परत केली जाते. यामुळे ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा वेळीच भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ज्वारीच्या भावात तीव्र वाढ
जळगाव बाजार समितीत ज्वारीच्या भावात ₹1,100 प्रति क्विंटल इतकी मोठी वाढ झाली आहे .

ड्रग्स पोटे प्रकरणात अधिकारी निलंबित
जळगाव पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना ड्रग्स प्रकरणी सेवेतून बडतर्फ व निलंबित करण्यात आलं .

सोने–चांदीचे भाव सतत बदलत
आजचे सोने आणि चांदीचे भाव आवक–उतार करत आहेत; सोने किंमतीत notable वाढ दिसून आली आहे .

पेट्रोल-डिझेल दरात घट होण्याची शक्यता
जळगावात पेट्रोल व डिझेलचे दर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे, केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार .

ऑनलाइन फ्रॉड: तेहसीलदार बनून फसवणूक
धारंगावन येथील एका तरुणाने स्वतःला तहसीलदार दाखवून महिला फसवल्या, पोलिसांनी गुन्हा दाखल केला .

विश्व हिंदू परिषदेची बैठक
शहरात राष्ट्रभरातून ४६ प्रांतांचे प्रतिनिधी उपस्थित; हिंदू समाजाच्या भविष्यातील आव्हानांवर चर्चासत्रे .

जळगावातील राजकीय फेरफार
चाळीसगावचे माजी नगरसेवक भगवन पाटील, भूषण पाटीलसहित अनेक NCP (SP) नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला .

जळगावात पावसाची आवक थांबली, IMDचा अंदाज
जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन कधी होईल, याविषयी IMD कडून अद्यतन संकेत आले आहेत .

शस्त्रक्रिया अधूनमधून ः हाडाच्या ट्युमरवर १२ रुग्णांवर यशस्वी ऑपरेशन
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हाडाचा ट्युमर असलेल्या १२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली .

अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

What is BTS? : BTS म्हणजे काय?

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi


Spread the love
Tags: #JalgaonNews#JalgaonToday#Latestnewsinmarathi#MaharashtraNews#Top10News
ADVERTISEMENT
Previous Post

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

Next Post

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता – गिरीश महाजन यांची माहिती

Related Posts

Padmalaya Storage Tank Project  

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता – गिरीश महाजन यांची माहिती

July 18, 2025
Maintenance and Welfare of Parents Act 2007

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

July 18, 2025
Taekwondo Zonal Tournament उद्घाटन अनुभूती स्कूल जळगाव

अनुभूती स्कूलमध्ये Taekwondo Zonal Tournament – सात जिल्ह्यांचे ६० खेळाडू सज्ज

July 18, 2025
Jalgaon Weather Alert - Heatwave and Rain Break July 2025

Jalgaon Weather Alert: पावसाला ब्रेक, पुढील ५ दिवस उकाड्याचा तडाखा!

July 17, 2025
Recruitment

Job Fair Jalgaon | जळगावात 374 पदांसाठी रोजगार मेळावा

July 15, 2025
xtra marital affair murder case 

Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार

July 14, 2025
Next Post
Padmalaya Storage Tank Project  

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता - गिरीश महाजन यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Padmalaya Storage Tank Project  

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता – गिरीश महाजन यांची माहिती

July 18, 2025
Jalgaon News Today

जळगाव जिल्ह्यातील आजच्या २० महत्वाच्या बातम्या वाचा – Top 20 Jalgaon News Today

July 18, 2025
Maintenance and Welfare of Parents Act 2007

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

July 18, 2025
Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation

Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation: राजपुत समाजासाठी ₹200 कोटींच्या भांडवली मदतीची विधिमंडळात मागणी

July 18, 2025
Taekwondo Zonal Tournament उद्घाटन अनुभूती स्कूल जळगाव

अनुभूती स्कूलमध्ये Taekwondo Zonal Tournament – सात जिल्ह्यांचे ६० खेळाडू सज्ज

July 18, 2025
Ladki Bahin Yojana ;  राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

July 18, 2025
Load More
Padmalaya Storage Tank Project  

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता – गिरीश महाजन यांची माहिती

July 18, 2025
Jalgaon News Today

जळगाव जिल्ह्यातील आजच्या २० महत्वाच्या बातम्या वाचा – Top 20 Jalgaon News Today

July 18, 2025
Maintenance and Welfare of Parents Act 2007

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

July 18, 2025
Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation

Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation: राजपुत समाजासाठी ₹200 कोटींच्या भांडवली मदतीची विधिमंडळात मागणी

July 18, 2025
Taekwondo Zonal Tournament उद्घाटन अनुभूती स्कूल जळगाव

अनुभूती स्कूलमध्ये Taekwondo Zonal Tournament – सात जिल्ह्यांचे ६० खेळाडू सज्ज

July 18, 2025
Ladki Bahin Yojana ;  राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

July 18, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us