जळगाव,(प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज जळगाव जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन,जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, वस्रउद्योग मंत्री ना. संजय सावकारे, क्रीडामंत्री ना.माणिकराव कोकाटे खा. स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

या बैठकीत जळगाव जिल्हा सिंचन धोरण, खरीप हंगामाची तयारी, तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजना, शेततळे योजना, विभागीय क्रीडा संकुल उभारणी, गंगाखेड बेट पर्यटनासह पर्यटन विकास यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा झाली. त्याचबरोबर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी पायाभूत सुविधा, रेल्वे एकत्रीकरण, MIDC औद्योगिक विकास आणि बँकिंग पतपेढी आराखड्याबाबतही सविस्तर चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.
यावेळी जळगाव जिल्हा नियोजन समिती कार्यालय अधिलेख कक्षाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करणे हा आपला ध्यास असून, प्रत्येक क्षेत्रात प्रगती साध्य करण्यासाठी राज्य सरकार व जिल्हा प्रशासन सातत्याने कार्यरत राहील, असे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले.
१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?
Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा