जळगाव | नजरकैद न्यूज – जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरवात केली असतांना प्रभाग क्र. ०३ (ब) अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर निवडणूक लढवीत असणाऱ्या अपक्ष उमेदवार सौ. चैताली राहुल (मोगली बाबा) ठाकरे यांनी आज दिनांक ५ जानेवारी रोजी दिनकर नगर परिसरात भव्य रॅली काढत होम-टू-होम मतदारांशी थेट संवाद साधला. “येत आहे जनतेच्या दारी, जन-सामान्यांचा आशीर्वाद घ्यायला..!” या भावनेतून नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे ठाम वचन दिले.

रॅलीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विश्वासू कर्तृत्व, दमदार नेतृत्व आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे सौ. चैताली ठाकरे यांच्याबद्दल महिलांमध्ये, युवकांमध्ये तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष विश्वास व्यक्त होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.अपक्ष उमेदवार सौ. चैताली राहुल (मोगली बाबा) ठाकरे यांनी विकासासाठी ठोस मुद्दे मांडले
होम-टू-होम भेटीत सौ. ठाकरे यांनी पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले –
•प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व दुरुस्ती
•नियमित पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थेचे नियोजन
•स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व आरोग्य सुविधा बळकट करणे
•महिलांसाठी स्वावलंबन योजना, बचत गटांना प्रोत्साहन
•युवकांसाठी क्रीडा व रोजगाराभिमुख उपक्रम
•स्ट्रीट लाइट, ड्रेनेज व मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे
“निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून, प्रभागातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आहे,” असे सांगत त्यांनी प्रामाणिक, पारदर्शक व लोकाभिमुख कारभार देण्याची ग्वाही दिली.
बॅट निशाणीला मतदानाचे आवाहन
या निवडणुकीत निशाणी – बॅट, अनुक्रमांक ३ असलेल्या सौ. चैताली राहुल (मोगली बाबा) ठाकरे यांना डॉट या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. “जनतेचा विश्वास हेच माझे खरे भांडवल आहे,” असे म्हणत त्यांनी नागरिकांचा आशीर्वाद मागितला.दिनकर नगर परिसरात काढलेल्या या रॅलीमुळे निवडणूक प्रचाराला चांगलीच धार आली असून, प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
होम टू होम संवाद व रॅलीदरम्यान महेश अभिमन सानवने,गोकूळ सपकाळे,भोलानाथ सपकाळे,रामचंद्र तायडे,आकाश सपकाळे,प्रताप सपकाळे, अर्जुन सपकाळे,समाधान सोनवणे,ज्ञानेश्वर साळुंखे, मुकेश सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, शामकांत अहिरे, सोपान सपकाळे, ईश्वर रायसिंगे, दीपक ठाकूर, नंदू शिंपी, वासुदेव बाविस्कर, भानुदास सपकाळे, गोकुळ तायडे, दिलीप सोनवणे, आशा सोनवणे, रेखा साळुंखे, उषाबाई तायडे, सरलाबाई रायसिंगे, कविता बाविस्कर, रेखा शिंपी, जनाबाई सपकाळे, सुमनबाई सपकाळे, अरुणा सपकाळे,शोभाबाई बिधडे, आशाबाई तायडे, उषाबाई सोनवणे, शोभाबाई सोनवणे, दगुबाई सपकाळे भारतीताई कोळी, आशाताई ठाकूर, सुभद्राबाई पाटील यांचा सहभाग होता.












