जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होण्याऐवजी आणखी वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. २ ते ४ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. या काळात वाऱ्याचा वेग वाढणार असून, शेतकऱ्यांच्या पिकांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महत्वाची बातमी : 1.5 लाख भारतीय पदवीधर विद्यार्थी बेरोजगार होण्याच्या उंबरठ्यावर ; अमेरिकेत नोकऱ्या धोक्यात!
हवामान विभागाचा इशारा
हवामान खात्याने जाहीर केलेल्या अलर्टनुसार, पुढील तीन दिवस जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीसह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. उडीद आणि मूग यांसारखी काढणीस आलेली पिके मोठ्या प्रमाणात दुष्परिणामाला सामोरे जाण्याची भीती आहे.

उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर
उत्तर महाराष्ट्रालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याचा परिणाम थेट जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांवर होणार आहे.नंदुरबारमध्ये आतापर्यंत २२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
महत्वाची बातमी- NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?
पुढील काही दिवस पाऊस कायम राहिल्यास धरणे ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जरी या पावसामुळे रब्बी हंगामासाठी पाण्याची चिंता कमी झाली असली, तरी खरीप पिकांसाठी तो धोकादायक ठरू शकतो.
महत्वाची बातमी – ₹684/महिन्यापासून सुरू – Health Insurance EMI वर”
आगामी पाच दिवसांचा हवामान अंदाज
२ सप्टेंबर ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस (यलो अलर्ट)
३ सप्टेंबर मुसळधार पाऊस (यलो अलर्ट)
४ सप्टेंबर ३०-४० किमी वेगवान वारे + जोरदार पाऊस (यलो अलर्ट)
५ सप्टेंबर पूर्ण ढगाळ वातावरण, मध्यम स्वरूपाचा पाऊस
६ सप्टेंबर ढगाळ वातावरण, तुरळक पावसाची शक्यता

नागरिकांसाठी प्रशासनाचा इशारा
1. अनावश्यक घराबाहेर पडू नका.
2. वीजपुरवठा व वाहतूक यामध्ये व्यत्यय येऊ शकतो, त्यासाठी तयारी ठेवा.
3. नदी-नाल्याजवळील भाग टाळा.
4. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.
जळगावकरांनी पुढील तीन दिवस सतर्क राहण्याची गरज आहे. हवामान विभाग व प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
महत्वाचे :- Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?
महत्वाचे :- पर्सनल लोन घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
हे पण वाचा :- Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा
हे पण वाचा :- Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
हे पण वाचा :- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!