Tarun Vyavsayik Suicide Jalgaon जळगाव शहरात 26 वर्षीय तरुण व्यावसायिक विशाल अशोक देसमुख याने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह मेहरुण तलावात सापडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.Tarun Vyavsayik Suicide J

मोहननगर येथील 26 वर्षीय तरुण व्यावसायिक विशाल अशोक देसमुख याचा मृतदेह सोमवारी सकाळी मेहरुण तलावात आढळला. ही आत्महत्येची घटना असून, शहरात मोठी खळबळ उडाली आहे.Tarun Vyavsayik Suicide Jalgaon
विशाल याने रविवारी रात्री दुचाकीवरून घरातून बाहेर पडल्याची माहिती मिळते. त्यानंतर तो परतलाच नाही. मेहरुण तलाव परिसरात त्याची दुचाकी सापडल्याने संशय बळावला. पोलिसांनी शोधमोहीम राबवून सोमवारी सकाळी मृतदेह बाहेर काढला.
शेवटचा मेसेज व सोशल मीडिया स्टेटस
विशालने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक भावनिक स्टेटस टाकल्याचे निदर्शनास आले आहे. “मी स्वतःचा पराभव स्वीकारतोय,” अशा आशयाचे स्टेटस होते. त्यामुळे मानसिक तणावाचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
स्थानिकांत हळहळ:
विशाल हा मेहनती, शांत आणि चांगल्या स्वभावाचा होता, असे परिसरातील लोकांनी सांगितले. त्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.