Breking news | Jalgaon Former Corporator Bunty Joshi Suicide | जळगाव शहरात माजी नगरसेवक बंटी जोशी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता.
जळगावमधील धक्कादायक घटना : माजी नगरसेवक बंटी जोशी यांची आत्महत्या
जळगाव – शहरातील जयनगर परिसरातून एक मोठी आणि दु:खद घटना समोर आली आहे. जळगाव महानगरपालिकेतील माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी (वय ५०) यांनी स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली असून, यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

घटना कशी उघडकीस आली?
सायंकाळी साडेसातच्या सुमारास बंटी जोशी यांनी आपल्या घरात गळफास घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. तातडीने त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात शोककळा पसरली.
बंटी जोशी यांचं राजकीय करिअर
बंटी जोशी हे राजकारणात अभ्यासू आणि समर्पित नगरसेवक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून केली आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आणि नंतर शिवसेनेच्या ठाकरे गटात कार्यरत होते. २०१७ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला होता.

आत्महत्येमागचं कारण काय?
बंटी जोशी यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस तपास सुरू असून अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.बंटी जोशी यांचं व्यक्तिमत्व हसतमुख आणि सर्वांना जोडून ठेवणारं होतं. त्यांचं अचानक जाणं हे त्यांच्या मित्रपरिवार, कुटुंबीय आणि समर्थकांसाठी मोठा धक्का आहे. घटनास्थळी आणि रुग्णालयात अनेक मान्यवरांनी धाव घेतली होती.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
संबंधीत बातम्या👇🏻
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?:कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर