Government Employees Pension Update : केंद्र सरकारने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेंशन प्रक्रियेत मोठा बदल केला

नवी दिल्ली | केंद्र सरकार : केंद्र सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पेंशन आणि इतर लाभांसाठी महिनोमहिने कार्यालयात चकरा मारावी लागू नये.
सरकारने नवीन आदेश जारी करून ठरवले आहे की, प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होण्याच्या दोन महिने आधीच पेंशन पेमेंट ऑर्डर (PPO) देणे बंधनकारक राहील. यामुळे निवृत्तीच्या प्रक्रियेत मोठा वेग येईल आणि कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होईल.
‘पेंशन मित्र’ करणार मदत
या नव्या योजनेत सर्वाधिक महत्त्वाचा बदल म्हणजे, प्रत्येक विभागात आता ‘पेंशन मित्र’ किंवा कल्याण अधिकारी नियुक्त केला जाईल.
हा अधिकारी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेंशन अर्ज भरण्यापासून ते आवश्यक कागदपत्रे जमा करण्यापर्यंत मदत करेल.
कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना फॅमिली पेंशन मिळवून देण्याची जबाबदारीही या अधिकाऱ्यांवर असेल.
यामुळे कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल.
‘भाविष्य’ पोर्टल आणि e-HRMS

सरकारने सर्व प्रक्रिया अधिक पारदर्शक व वेगवान करण्यासाठी ‘भाविष्य’ नावाचे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.
सर्व मंत्रालये आणि विभागांना या पोर्टलशी जोडण्यात आले आहे, जेथे पेंशन प्रकरणांवर ऑनलाइन लक्ष ठेवता येईल.
कर्मचाऱ्यांची सर्व्हिस बुक डिजिटल (e-HRMS) स्वरूपात ठेवली जाईल, ज्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करणे आणि माहिती तपासणे सोपे होईल.
चौकशी असूनही पेंशन थांबणार नाही
पूर्वी एखाद्या कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी सुरू असल्यास त्यांची पेंशन थांबवली जात असे. नवीन नियमांनुसार, चौकशी असली तरी कर्मचाऱ्याला तात्पुरती पेंशन (Interim Pension) दिली जाईल.
केवळ ग्रॅच्युइटीची रक्कम चौकशी पूर्ण होईपर्यंत रोखून ठेवली जाईल.
दोन महिने आधी PPO अनिवार्य

CCS (Pension) नियम 2021 अंतर्गत आता निवृत्तीपूर्वी दोन्ही महिने आधी PPO किंवा e-PPO जारी करणे बंधनकारक आहे.
यामुळे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक आणि तणावमुक्त निवृत्तीचा अनुभव मिळेल.
कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या अधिकारासाठी वाट पाहावी लागणार नाही.
सरकारच्या या निर्णयामुळे पेंशन प्रक्रियेतील विलंब कमी होईल, पारदर्शकता वाढेल, आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे हक्क सुरक्षित राहतील.

Murder Case: ८ तासांत उकल, सहकाऱ्यानेच केला मजुराचा खून
ICSI Recruitment 2025: सीए आणि सीएस पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, 75 हजारांपर्यंत पगार
Online Shear Froud:नोकरदाराला १३ लाखांचा गंडा
LIC ने लॉन्च केल्या नवीन योजना: Jan Suraksha आणि Bima Lakshmi, 15 ऑक्टोबरपासून उपलब्ध
Sangli Gold Fraud: सांगलीतील सराफावर 23 लाखांचा सोन्याचा गंडा
PM Kisan: 31 लाख अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळणार, 1.76 लाख अल्पवयीन मुलांचाही समावेश
RRP Semiconductor आणि सचिन तेंडुलकर कनेक्शनवर कंपनीचं स्पष्टीकरण — 57,000% शेअर वाढीमागचं सत्य!









