Friendship Day: जळगाव येथील डॉ.अण्णासाहेब.जी.डी बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त ),जळगाव येथे कला मंडळातर्फे संगीतमय वातावरणात “फ्रेंडशिप डे” अर्थात मैत्री दिन साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला मंडळ प्रमुख डॉ. अनिता कोल्हे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. जे पाटील होते. विद्यार्थिनींमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण व्हावे तसेच कॅम्पस मधील नंदिनीबाई वामनराव मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय, व डॉ अण्णासाहेब जी .डी.बेंडाळे कनिष्ठ महिला महाविद्यालय, यांनी एकत्र येऊन जागतिक मैत्री दिवस साजरा करण्यात आला .

याप्रसंगी प्राचार्य डॉ व्ही.जे.पाटील यांनी जीवनातील मैत्रीचे महत्त्व मनोगतातून व्यक्त करून सर्व विद्यार्थिनींना जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर संगीत विभाग प्रमुख प्रा.ऐश्वर्या परदेशी यांनी गायलेल्या मैत्रीच्या गाण्यावर व डी.जे तालावर विद्यार्थिनींनी मैत्रीच्या भावना मनोगतातून प्रगट केल्या. त्यानंतर प्रा. ऐश्वर्या परदेशी व विद्यार्थिनींनी मैत्रीवर गाणी सादर केली.
स्पोर्ट्स विभागातील विद्यार्थिनी कृष्णाली चांदेलकर, नम्रता बाविस्कर, किरण बहारे, देवयानी सोनवणे, पुनम सोनवणे व निकिता बारी यांनी “आपली यारी” या गाण्यावर नृत्य सादर केले. त्यानंतर विविध विद्यार्थिनींनी आपल्या जिवलग मैत्रिणींसोबत पुढे येऊन त्यांच्या मैत्रीबद्दलचे विविध अनुभव सांगितले. प्रश्नमंजुषा, गेम्स व गाणी यांनी कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थिनींनी एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधून मैत्रीचे नाते घट्ट केले .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे व उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. सुनीता पाटील व नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयाच्या प्राचार्य चारुलता पाटील ,प्रा.राहूल वराडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास कला मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश कोष्टी व प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी केले. तर प्रा. रंजना पाटील,प्रा शीतल चौधरी यांनी आभार मानले..