Donald Trump India Tariffs | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या टॅरिफ धोरणावर आणि रशियाच्या मेदवेदेव यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांची सडकून टीका : “भारत आणि रशिया त्यांची मृत अर्थव्यवस्था घेऊन एकत्र बुडोत”
ट्रम्प यांचे ट्विट चर्चेत; भारताच्या टॅरिफ धोरणावर आणि मेदवेदेव यांच्यावर थेट टीका
वॉशिंग्टन, ३१ जुलै २०२५ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून एक वादग्रस्त ट्विट करत भारत आणि रशिया या दोन देशांवर सडकून टीका केली आहे.

ट्रम्प यांचे वादग्रस्त ट्विट (Donald Trump India Tariffs )
> “I don’t care what India does with Russia. They can take their dead economies down together, for all I care. We have done very little business with India, their Tariffs are too high, among the highest in the World. Likewise, Russia and the USA do almost no business together. Let’s keep it that way, and tell Medvedev, the failed former President of Russia, who thinks he’s still President, to watch his words. He’s entering very dangerous territory!”
— Donald J. Trump, @realDonaldTrump
ट्रम्प यांचं ट्विट (Donald Trump India Tariffs )
“भारत रशियासोबत काय करतं, याची मला काहीही पर्वा नाही. ते दोघं त्यांच्या ‘मृत अर्थव्यवस्था’ घेऊन एकत्र बुडोत, मला फरक पडत नाही. भारतासोबत आपला व्यापार फारच कमी आहे – कारण त्यांच्या आयात शुल्काची पातळी ही जगात सर्वाधिक आहे.
त्याचप्रमाणे रशिया आणि अमेरिका यांच्यातही व्यापार जवळपास नाहीच. आणि तो तसाच राहू द्या. तसेच, रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव, ज्यांना वाटतं ते अजूनही राष्ट्राध्यक्ष आहेत – त्यांनी आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावं. तो अतिशय धोकादायक पातळीवर प्रवेश करत आहे.”
भारताच्या टॅरिफ धोरणावर Donald Trump यांची नाराजी (Donald Trump India Tariffs )
ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत भारताच्या टॅरिफ धोरणावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, भारतात अमेरिकन कंपन्यांना ज्या अडचणी येतात, त्यात प्रमुख अडथळा म्हणजे भारताचे उच्च आयात कर (Tariffs) आहेत.
ही नाराजी ट्रम्प प्रशासनाच्या काळातही अनेक वेळा दिसून आली होती. त्यांनी भारतासोबत व्यापार फारच कमी असल्याचेही नमूद केले.

सरकारी नोकरी कुठे? वाचा –
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
रशियाच्या मेदवेदेव यांना इशारा
ट्रम्प यांनी दिमित्री मेदवेदेव यांना “अपयशी माजी राष्ट्राध्यक्ष” म्हणत थेट इशारा दिला. मेदवेदेव यांनी अलीकडील काळात अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांविरोधात अनेक आक्रमक वक्तव्य केली आहेत.ट्रम्प यांच्या ट्विटनुसार, “मेदवेदेवने त्याची जीभ सांभाळावी, तो फारच धोकादायक पातळीवर जात आहे.”
Donald Trump यांचा मूळ हेतू काय? (Donald Trump India Tariffs )
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की ट्रम्प यांचा उद्देश पुन्हा एकदा त्यांच्या America First धोरणावर लक्ष केंद्रीत करण्याचा आहे.
जसाप्रकारे त्यांनी चीनविरोधात टॅरिफ लावले होते, त्याचप्रमाणे आता भारतावर टीका करत अमेरिकन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.

या विधानाचा भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम?
सध्या भारत सरकारकडून या विधानावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी या ट्विटचा राजनैतिक आणि व्यापारी संबंधांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
विशेषतः अमेरिकेत आगामी निवडणुका जवळ आल्याने ट्रम्प यांच्या अशा विधानांचा व्यापारी चर्चांवर परिणाम होऊ शकतो.ट्रम्प यांचे ट्विट भारत आणि रशिया दोघांनाही उद्देशून आक्रमक होते.
त्यांनी भारताच्या आयात कर रचनेवर टीका केली आणि रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव यांना थेट इशारा दिला.या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात तणावाची शक्यता निर्माण झाली आहे.Donald Trump India Tariffs
https://x.com/TrumpDailyPosts/status/1950784428482937332?t=97LIKfPf7ULM8anM1aBzpw&s=19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या टॅरिफ धोरणावर आणि रशियाशी असलेल्या संबंधांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला “मृत” म्हणत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर खळबळ उडवली आहे. या वक्तव्यामुळे भारत-अमेरिका संबंधांवर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर भारत सरकारची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. परंतु ट्रम्प यांच्या अशा विधानामुळे आगामी अमेरिकन निवडणुकांत “America First” धोरण अधिक आक्रमकपणे पुढे येण्याचे संकेत मिळत आहेत.
Former U.S. President Donald Trump called India’s and Russia’s economies “dead” in a recent post, accusing both nations of exploiting the U.S. through unfair trade. The statement triggered global reactions, raising concerns about future India-U.S. ties. Indian experts dismissed the claim, highlighting India’s strong economic growth.
संबंधीत बातम्या👇🏻
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर