अलीकडच्या काळात नात्यांना काळीमा फासणाऱ्या आणि समाजाला हादरवून सोडणाऱ्या घटनांची मालिका सातत्याने उघडकीस येत आहे. कुटुंबातील विश्वास, सुरक्षितता आणि नातेसंबंधांचा आधारच तुटत चालल्याचे धक्कादायक चित्र यातून समोर येत आहे. कधी वडीलधाऱ्यांवर, तर कधी जवळच्या नात्यांवर होणारे अत्याचार समाजव्यवस्थेला कलंक लावत असून, अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व असुरक्षिततेची भावना वाढताना दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लष्करात कार्यरत असलेल्या जवानाने स्वतःच्या विधवा सासूवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच तो थांबला नाही तर तिचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून सतत धमकावत अत्याचार सुरू ठेवले. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
हॉटेलमध्ये घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात पीडित महिला आपल्या जावयासोबत कारने दिल्लीकडे जात होती. या प्रवासादरम्यान आरोपी जावयाने तब्येत बिघडल्याचा बहाणा करत कार एका हॉटेलवर नेली. तिथे खोली बुक करून त्याने महिलेला थांबवले. नंतर कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून दिल्याने महिला बेशुद्ध झाली आणि त्यावेळी तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
व्हिडीओद्वारे धमकी
शुद्धीवर आल्यानंतर महिलेला जेव्हा संपूर्ण प्रकार समजला तेव्हा तिने विरोध दर्शवला. परंतु आरोपी जावयाने तिचेच अश्लील व्हिडीओ दाखवत धमकावले. या व्हिडीओंच्या आधारे त्याने अनेक वेळा अत्याचार केला. एवढेच नव्हे तर तिच्या मालमत्तेची कागदपत्रेही ताब्यात घेतली.
आत्महत्येचे प्रयत्न
संपूर्ण घटनेनंतर आपल्या मुलीचे वैवाहिक आयुष्य बिघडू नये म्हणून पीडित महिला बराच काळ गप्प राहिली. मात्र सततच्या छळामुळे तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. शेवटी जावयाच्या अत्याचाराला कंटाळून तिने धैर्य दाखवत पोलिसांकडे धाव घेतली.
गुन्हा दाखल
राबुपुरा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला असून आरोपी जवानाविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Latest news :
NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?
तुमचा क्रेडिट स्कोर लो आहे का? पर्सनल लोन मिळवण्यासाठी या 6 ट्रिक्स ठरतील उपयोगी!
SIP मध्ये होणाऱ्या गुंतवणूक करतांना या ५ चुका टाळा,अन्यथा…
US Visa Interview Waiver बंद : भारतीय विदयार्थ्यांवर थेट परिणाम,अमेरिकेने घेतला मोठा निर्णय!
महत्वाचे :- Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?
महत्वाचे :- पर्सनल लोन घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
हे पण वाचा :- Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा
हे पण वाचा :- Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
हे पण वाचा :- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!