धुळे (प्रतिनिधी) : मा. ध. पालेषा वाणिज्य, कला व विज्ञान महाविद्यालय, धुळे येथील ग्रंथपाल प्रा. डॉ. चंद्रशेखर वाणी यांना रोटरी क्लब ऑफ धुळे तर्फे नेशन बिल्डर्स अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
शिक्षक हा समाजपरिवर्तनाचा मूळ आधारस्तंभ असून राष्ट्राला योग्य दिशा देण्याचे कार्य शिक्षकच करतात. या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब धुळे दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील गुणवंत शिक्षक, प्राध्यापक व ग्रंथपाल यांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड देऊन गौरवित असते. पुरस्कारामध्ये प्रशस्तीपत्र आणि मानवस्त्र असे स्वरूप असते.
या सन्मानानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रभाकर महाले यांनी तसेच सर्व शिक्षकांनी डॉ. वाणी यांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष मा. युवराजजी करनकाळ, मानद सचिव श्री. संतोषजी आग्रवाल व ज्येष्ठ संचालक रवीजी बेलपाठक यांनीही कौतुक व्यक्त केले.