जळगाव, नजरकैद न्यूज । २ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिकेत महायुतीमधील भाजपने सुरुवातीला खाते उघडल्यानंतर माघारीच्या अखेरच्या दिवशी प्रभाग ७ क मधून आमदार राजूमामा भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड बुधवारी निश्चित झाल्यानंतर काल गुरुवारी शिवसेना शिंदे गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. यात प्रभाग क्रमांक 18-अ मधून शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ गौरव चंद्रकांत सोनवणे यांची, प्रभाग क्रमांक ९ अ मधून मनोज चौधरी, तर प्रभाग 9 ‘ब’ मधून प्रतिभा देशमुख आणि आज १९ अ मधून रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली
यानंतर आता भाजपची दुसरी जागा बिनविरोध झाली आहे. विशाल भोळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामुळे विशाल भोळे हे पहिल्यांदाच महापालिकाच्या माध्यमातून निवडणुकीत उभे राहिली आणि बिनविरोध निवड झाली आहेत. त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट आहे.
दरम्यान, जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. आतापर्यंत जळगाव महापालिकेत महायुतीचे १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये भाजपचे ०६ तर शिवसेना शिंदे गटाचे ०६ जागांचा समावेश आहे












