Bhusawal Railway Route Change : भुसावळ रेल्वे विभागातून जाणाऱ्या काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांच्या मार्गात ९ ऑगस्टपासून बदल करण्यात येणार आहेत. नवीन अपडेट तपासा.
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती: भुसावळ विभागातील काही रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल
भुसावळ – उत्तर-मध्य रेल्वेच्या झाँसी विभागात ‘मथुरा स्थानकावर’ चालणाऱ्या डबल लाइन आणि सिग्नलिंग कामासाठी काही रेल्वेगाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. यामुळे भुसावळ रेल्वे विभागातून धावणाऱ्या काही गाड्या वळवण्यात येणार आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार,

मथुरा – झाँसी सेक्शनवर नॉन-इंटरलॉकिंग काम ३१ जुलैपासून ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान सुरू राहणार आहे.
कुठल्या रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलला आहे?
या कामामुळे खालील गाड्या त्यांच्या नियमित मार्गाऐवजी वळवलेल्या मार्गावरून धावतील:
गाडी क्र. १२१०७ पुणे – लखनऊ एक्सप्रेस
गाडी क्र. १२१०८ लखनऊ – पुणे एक्सप्रेस
वरील गाड्या आता मथुराऐवजी अछनेरा, बयाना, हिंडौन सिटी, गंगापुर सिटी मार्गे धावतील.
महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी?
Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल
आजचे राशीभविष्य | 25 July 2025
प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक तपासा
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, प्रवासापूर्वी संबंधित गाड्यांच्या वेळापत्रकाची व मार्गाची खात्री करूनच पुढील नियोजन करावे. या तात्पुरत्या बदलामुळे काही प्रमाणात प्रवासात वेळ वाढू शकतो.
महत्वाचे हायलाइट्स
मथुरा-जांसी सेक्शनमध्ये नॉन-इंटरलॉकिंगचे काम
३१ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान काम चालणार
पुणे-लखनऊ एक्सप्रेस मार्ग वळवण्यात येणार
प्रवाशांनी तिकिट बुक करताना नवे मार्ग तपासावेत