भडगाव प्रतिनिधी:-शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था भडगांव येथे अवैध वाळु चोरी करतांना जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर दिनांक १७ जुलै ते ५ ऑगस्ट २०२५ दरम्यान ५ लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर चोरी झाल्याची फिर्याद नायब तहसिलदार सुधीर किटकुल सोनवणे यांनी भडगाव पोलीस स्टेशनला दिली होती. भडगाव पोलीसांनी गु.र. नं. २८३/२०२५, कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मा. पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. गोपनीय माहितीच्या आधारे गिरड (ता. भडगाव) येथील सुनिल कैलास पाटील हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीस ताब्यात घेऊन चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्यानंतर चोरीस गेलेले ट्रॅक्टर (किंमत ₹५,००,०००) जप्त करण्यात आले.ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश शर्मा,पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे, पोना मनोहर पाटील, पोका प्रविण परदेशी आणि चालक संजय पाटील यांनी केली. याबाबत पुढील तपास पो.ना भूषण पाटील करीत आहेत.