Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

najarkaid live by najarkaid live
January 7, 2026
in जळगाव
0
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत हा महोत्सव होणार आहे. या २४ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., व संस्कृती मंत्रालय भारत सरकार, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स आहे. तसेच सुहान्स केमिकल्स प्रा. लि., दाल परिवार, वेगा केमिकल्स प्रा. लि. न्युबो टेक्नॉलॉजीस, चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. यांचेही सहकार्य मिळणार आहे. या महोत्सवात पहिल्या दिवशी सहभागी होणाऱ्या कलावंत परीचय.

श्रुती बुजरबरुआ (गायन)

श्रुती बुजरबरुआ ह्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या गायिका तसेच पार्श्वगायिका आहेत. त्यांचा जन्म व पालनपोषण आसाममध्ये एका संगीतपरिवारात झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांनी आपल्या पालकांकडून मुनींद्र बुजरबरुआह आणि सौ. संगीता बुजरबरुआह यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली.

त्यांनी भातखंडे संगीत विद्यापीठ, लखनऊ येथून ‘संगीत विशारद’ व ‘संगीत अलंकार’ या पदव्या प्राप्त केल्या आहेत. शुद्ध शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा, मराठी अभंग, भजन, गझल इत्यादी उपशास्त्रीय संगीतप्रकारांमध्येही त्या आपल्या सुमधुर स्वरांची छटा उलगडतात. श्रुती या आसामी, इंग्रजी, हिंदी, बंगाली व मराठी भाषा बोलू शकतात. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे.

चिराग कट्टी (सतार वादन)

चिराग कट्टी हे आजच्या काळातील भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत प्रतिभावान व आशादायी तरुण सतारवादक आहेत. आपले वडील व गुरु पं. शशांक कट्टी यांच्याकडून संगीताचे धडे घेतलेल्या चिराग हे आकाशवाणीचे ‘अ’ दर्जाचे कलाकार आहेत. २०१७ व २०२४ या दोन्ही वर्षांत त्यांनी आकाशवाणीच्या प्रतिष्ठित ‘नॅशनल प्रोग्रॅम’मध्ये सादरीकरण केले आहे.

ते ‘सुरमणी’ पुरस्काराचे मानकरी असून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (ICCR) पॅनेलवर निवडलेले कलाकार आहेत. तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून त्यांना सतार वादनासाठी शिष्यवृत्तीही प्राप्त झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

Next Post

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव :जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

Related Posts

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

January 3, 2026
Next Post
जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव :जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव :जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us