Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Anubhuti School Nashik Award: प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

कौशल्य व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात ; सोहळ्यात मान्यवरांची लाभली उपस्थिती

najarkaid live by najarkaid live
July 29, 2025
in जळगाव
0
Anubhuti School Nashik Award:  प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार
ADVERTISEMENT

Spread the love

Anubhuti School Nashik Award | नाशिक येथील अनुभूती स्कूलला प्रीतिसुधा शिक्षण फंडातर्फे दिला जाणारा ‘कौशल्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्य वाढवण्याच्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली.

जळगाव, प्रतिनिधी – व्यापार उद्योग करणारा जैन समाज ज्ञानाचीही पूजा करतो हे कौतुकास्पद आहे. मला मिळालेला पुरस्कार अनुभूती स्कूलच्या वतीने स्वीकारत आहे. जळगाव येथील भवरलाल कांताई फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही समाजाकडून मिळालेले समाजाला अर्पण करतो. असे प्रतिपादन अशोक जैन यांनी केले. ते नाशिक येथील जैन श्वेतांबर स्थानक वासी श्री संघ आणि प.पू. प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे कौशल्य पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.

येथील जैन श्वेतांबर स्थानक वासी श्री संघ आणि प.पू. प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. काल रविवारी (दि.२७) सकाळी कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात हा समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महासाध्वी परमपूज्य किरणसुधाजी यांनी आपल्या अत्तचनाने सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी जैन उद्योग समूहाचे अशोक जैन व अनुभूति निवासी स्कूलच्या संचालिका निशा जैन यांना शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अनुभूति निवासी स्कूलला कौशल्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योजक के भार. बेदमुथा, विशेष प्रमुख पाहुणे आ. प्रशांत बंब उपस्थित होते, कार्याध्यक्ष जे.सी. भंडारी यांनी स्वागत करून देणगीदारांविषयी माहिती दिली.

फंडाचे अध्यक्ष विजय बेदमुथा यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, या उपक्रमाने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. ४८ वर्षे गुणवंत गौरव सोहळा अखंडपणे सुरू आहे. सचिव अॅड. विद्युल्लता तातेड यांनी अहवाल सादर केला.

शिक्षण कौशल्य पुरस्कार प्रदान केल्यावर मनोगत व्यक्त करताना अशोक जैन यांनी अनुभूती शाळेत भारतीय संस्कृती केंद्रबिंदू मानून संस्कार केले जातात. देशातील पहिल्या ५ शाळात असून महाराष्ट्रातील निवासी शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. २० टक्के गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाते असे नमूद केले. आ. प्रशांत बंब म्हणाले, स्वातंत्र्यानंतर शेती आणि शिक्षण याकडे दुर्लक्ष झाले. आज राज्याच्या बजेटमध्ये शिक्षणावर व शिक्षकांच्या पगारावर खूप मोठा खर्च केला जातो. जैन इरिगेशनतर्फे शेतीसाठी योगदान देण्याबरोबरच कार्याद्वारे सातत्याने समाजसेवा केली जाते. जैन समाजातील प्रत्येकाने महिन्यातून एक दिवस शैक्षणिक कार्यासाठी, समाजोपयोगी सेवेसाठी द्यावा असे आवाहन आ. बंब यांनी केले, तसेच त्यांनी शिक्षण फंडासाठी देणगी जाहीर केली.

अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी ही भारत देशाचे भविष्य आहे, मुलांकडे उपजत असलेले ज्ञान, किमान कौशल्य असलेले गुण यांचा योग्य वेळी, योग्य पद्धतीने अधिकाधिक उपयोग होणे आवश्यक आहे, कारण विविध क्षेत्रात होत असलेला ए.आय.चा वापर हा सर्वांसाठी एक आव्हानात्मक भाग असून आहे ज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर होणे गरजेचे आहे.

भारतीय संस्कृतीच्या ज्ञानदालनाचा अभ्यास करता लक्षात येते की, नालंदा आणि तक्षशिला या विद्यापीठांनी संस्कारशील आणि कर्तबगार पिढ्या घडविल्यात. ज्ञानाचं हेच सांस्कृतिक संचित घेऊन अनुभूतीच्या शैक्षणिक वाटचालीची सुरुवात झाली. सर्वांनी शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभूतीची अनुभूती घ्यावी असे नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष के. आर बेदमुथा यांनी या फंडाची ४८ वर्षांपूर्वी स्थापना केली असल्याचे सांगून बेदमुथा इंडस्ट्रीज ४ हजार तरुणांना रोजगार देते व कररूपाने देशाला योगदान देते याकडे लक्ष वेधले. कौशल्य पुरस्कार हा स्व. कौशल्याबाई मोहनलाल बलदोटा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. कन्हैयालालजी बलदोटा नाशिक यांच्यातर्फे दिला जातो.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी गौरव बलदोटा, राहुल बाफणा, राहुल चोपडा, अजित सुराणा, मोहनलाल लोढा, सीए. अरुण बुरड, डॉ. कन्हैयालाल बलदोटा, वर्धमान लुंकड, चंपकलाल पारख, जक्रीलाल धीया, लता लुणावत, शोभा बोरा, संजय छोरीया, नेमीचंद तातेड़, मधुबाला कटारीया, राजेश कोटेचा (पुणे), प्रफुल बाफना, प.पू. श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंड उपाध्यक्ष लखमीचंद पारख, ब्रिजलाल कटारीया, विनोदजी बेदमुथा, खजिनदार ललित मोदी, सहसचिव हेमा लुंकड, राजेंद्र इंगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विशेष शैक्षणिक पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्दी प्रमुख प्रा. लोकेश पारख यांनी केले.

अशोक जैन यांच्याकडून विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी भरघोस मदत

भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशन व गांधी रिसर्च फाऊंडेशनला विविध संस्थांकडून मिळालेल्या पुरस्काराची रक्कम आणि त्यात अधिक रक्कमेची भर घालून ती त्या संस्थेसाठी देण्यात येते. त्याचप्रमाणे कौशल्य पुरस्काराच्या अकरा हजार रुपयांच्या रकमेत भरघोस रक्कम देण्याची घोषणा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली. सदर रकमेचा विनीयोग प्रितीसुधाजी शिक्षण फंडाच्यावतीने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी करण्यात येणार आहे.

संबंधीत बातम्या👇🏻

Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर

Spread the love
Tags: #AnubhutiSchool#EducationAward#EducationMatters#MarathiNews#NashikEducation#NashikNews#PritisudhaFund#SchoolAward#SkillAward#SkillDevelopment
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Next Post

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील ‘तो’ प्लॅट तीन वर्षासाठी सील!

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –  समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 17, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील 'तो' प्लॅट तीन वर्षासाठी सील!

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील 'तो' प्लॅट तीन वर्षासाठी सील!

ताज्या बातम्या

Latur Freshers Party Violence : फ्रेशर्स पार्टीत विद्यार्थ्याचा मृत्यू, तीन आरोपींवर खुनाचा गुन्हा

Latur Freshers Party Violence : फ्रेशर्स पार्टीत विद्यार्थ्याचा मृत्यू, तीन आरोपींवर खुनाचा गुन्हा

October 13, 2025
PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

October 12, 2025
Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

October 12, 2025
Navi Mumbai Cyber Scam: नागरिक फसले Online ₹1 Crore मध्ये

Navi Mumbai Cyber Scam: नागरिक फसले Online ₹1 Crore मध्ये

October 12, 2025
Professor Recruitment Maharashtra 2025: विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 12,000+ रिक्त पदे भरणार

Professor Recruitment Maharashtra 2025: विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 12,000+ रिक्त पदे भरणार

October 12, 2025
Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

October 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us