जळगाव : ॲग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन जल्लोषात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झाले. सोमवारी दि. २४ नोव्हेंबरपर्यंत कृषी प्रदर्शन सुरू असेल. आपला देश कृषीप्रधान आहे. शेतकरी आनंदी असेल, तर उद्योगधंदे, बाजारपेठ आणि संपूर्ण समाज सुखी राहतो, असे प्रतिपादन अशोक जैन यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक डी. डी. बच्छाव, मेट्रोजेन बायोटेक प्रा. लिचे संचालक प्रियंक शहा, रुची शहा, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी इफ्कोतर्फे ड्रोन फवारणाची प्रत्याक्षिक करण्यात आले. त्याला उपस्थितीत मान्यवरांसह शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला.
अशोक जैन पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या विविध साधनांची, नव्या तंत्रज्ञानाची आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांची उपलब्धता एका ठिकाणी करून देणे ही ॲग्रोवर्ल्ड प्रदर्शनाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. प्रदर्शनाचे आयोजक शैलेंद्र चव्हाण यांनी शेतकऱ्यांची गरज ओळखून गेली अकरा वर्षे हे प्रदर्शन यशस्वीपणे आयोजित केले. त्यामुळेच जळगावमधील कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो. अनेक नामांकित कंपन्या आपल्या संशोधनाधिष्ठित उत्पादनांसह प्रदर्शनात सहभागी झाल्या असून, उच्च गुणवत्तेची उत्पादने उपलब्ध करून देणे हेच आजच्या बाजारपेठेतील यशाचे महत्त्वाचे सूत्र आहे. सिंचन क्षेत्रात उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक साधनांमुळे पाण्याचा वापर कमी होण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट उपकरणे आणि सुधारित शेती पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुपटीने वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण
कृषी यंत्र व अवजारांच्या 45 स्टॉलसह प्रदर्शनात 210 हून अधिक स्टॉल्स आहेत. ॲग्रोवर्ल्ड प्रदर्शनात असलेले मका हार्वेस्टर मशीन एका दिवसात 8-10 एकर मका हार्वेस्ट करते. यात कणीस व गुरांसाठीचा चारा वेगळा होतो. विशेष म्हणजे यासाठी मजूर लागत नाही. पावसातही शेतात काम करणाऱ्या हाय व्हील्स चाकाच्या कृषी यंत्र व औजारांसह लहान मोठ्या कृषी यंत्र व औजारांचे तब्बल ४५ स्टॉल्स आहेत. फवारणीसाठीचे ड्रोन, बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती, कमी पाण्यात येणारी पिके अशा शेतकऱ्यांची मागणी व गरजेवर आधारित मांडणीचे स्टॉल्स हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे.
आज विक्रमी उत्पादक शेतकरीच सांगणार गुपित
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात आज (शनिवारी) जळगाव जिल्ह्यातील प्रवेशील शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. त्यातील केळी 35 टन, कापूस 17 क्विंटल, मका 60 क्विंटल, पपई 60 टन, कलिंगड 22 टन (एकरी) असे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरीच स्वतःच्या उत्पादनाचे गुपित कथन करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी डी जडे करतील.
जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड, अँग्रिसर्च इं. प्रा.लि., मेट्रोजेन बायोटेक प्रा. लि या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषीतंत्र, निर्मल सिड्स, नमो बायोप्लांटस, सातपुडा अँटोमोबाईल्स, श्रीराम ठिबक, राईज एन शाईन बायोटेक प्रा लि, कृषिदूत बायो हर्बल, ओम गायत्री नर्सरी, युनिटी एनर्जी प्रा लि, पॅक युनिव्हर्स, महाविरा झेरॉन, फायटोट्रॉन, गोदावरी फाऊंडेशन हे सहप्रायोजक ५ आहेत.
शेतमजूर समस्येच्या पर्यायावर भर, विविध पिकांतील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, शेती बरोबरच परसबाग / टेरेस गार्डन साठीची रोप (नर्सरी ), फळे व भाजीपसल्याच्या नर्सरी, सोलर फार्मिंग, झटका मशीन, बँक, शासकीय विभाग व अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. टिशूकल्चर केळीच्या कंपन्या, किचन गार्डन टूल्स, कमी पाण्यात, कमी श्रमात व हमीचे उत्पन्न देणारे अद्ययावत तंत्रज्ञान सखोल मार्गदर्शन, कमी श्रमात – कमी पाण्यात मात्र शाश्वत उत्पादन देणाऱ्या अपारंपरिक पिकांच्या स्टॉल्स शेतकऱ्यांचा पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.











