Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Affordable Housing Mumbai: मुंबईत सर्वसामान्यांसाठी ३५ लाख परवडणारी घरे बांधणार ; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Affordable Housing Mumbai : गिरणी कामगारांना होणार मोठा फायदा

najarkaid live by najarkaid live
July 17, 2025
in राज्य
0
Affordable Housing Mumbai

Affordable Housing Mumbai

ADVERTISEMENT
Spread the love

Affordable Housing Mumbai: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)यांनी मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याची घोषणा केली आहे. धारावीसह गिरणी कामगारांना घरे, ३५ लाख परवडणारी घरे बांधणार असल्याची माहिती.Affordable Housing Mumbai

 

Affordable Housing Mumbai सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार

 मुंबई महानगरातील (Mumbai Mahanagar) सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या (Marathi manus)मराठी माणसांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. याशिवाय महायुती (Mahayuti) सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल.

Affordable Housing Mumbai
Affordable Housing Mumbai

नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होतील तसेच झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी विधानसभेत दिली.(Affordable Housing Mumbai)

 

Affordable Housing Mumbai महायुती सरकार करणार सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे (Eknath shinde)बोलत होते. मुंबईला जगाशी जोडण्याचे काम आम्ही करतोय असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईचा मेकओव्हर खऱ्या अर्थाने आम्ही करतोय. मुंबईसाठी सर्वाधिक काम महायुती सरकारच्या (Mahayuti sarkar) काळात झालंय. ही कामं मुंबईकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईचा सर्वात मोठा विकास आम्ही करतोय. मुंबईचा सर्वार्थाने कायापालट केला जात आहे.

 

Affordable Housing Mumbai वरळीमध्ये ५५६ सदनिकांचे वाटप १५ ऑगस्टपर्यंत करणार

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे काम आम्ही करीत आहोत. यामध्ये मोतीलाल नगर गोरेगाव, जीटीपी नगर येथे समूह विकास प्रकल्पासाठी विकासकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे ४९०० रहिवाशांना घरे मिळणार आहेत. कामाठीपुरा अभ्युदयनगर इथल्या समुह विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून सप्टेंबर २०२५पर्यंत ती पूर्ण होईल. ११ हजार ४११ भाडेकरूंना पुनर्विकासाचा लाभ होणार आहे.

 

 

आदर्शनगर वरळी आणि वांद्रे रिक्लेमेशन येथे क्लस्टरचा लाभ २०१० रहिवाशांना होणार आहे त्याचीही निविदा प्रक्रिया सुरू आहे. वरळी नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. त्यामध्ये एकूण १५ हजार ६०० भाडेकरूंचे पुनर्वसन होणार आहे. त्यापैकी वरळीमध्ये ५५६ सदनिकांचे वाटप १५ ऑगस्टपर्यंत करणार आहोत.

 

एकूण सदनिकांपैकी २५ टक्के सदनिकांचे वाटप डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचे नियोजन केले आहे.रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन करतोय. या भागातून जाणाऱ्या पूर्वमुक्त मार्गाचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येतंय. पहिल्या टप्प्यात ६१४४ झोपडीधारकांचे पुनर्वसन होत असून एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Affordable Housing Mumbai गिरणी कामगारांच्या घरांसाठी हौसिंग स्टॉक वाढवणार

गिरणी कामगारांनी मुंबईच्या विकासासाठी मोठा त्याग केला आहे. आम्ही गिरणी कामगारांना मुंबईलगत घरे बांधून देणार आहोत. मुंबईबाहेर गेलेल्या गिरणी कामगारांना मुंबईत आणतोय. गिरणी कामगारांचे सर्वेक्षण करण्यासाठी अॅप तयार केले. मुंबईतल्या आजारी, बंद पडलेल्या गिरण्यांमधल्या १ लाख ७४ हजार १७२ गिरणी कामगारांची नोंद झाली.यापैकी २८ गिरण्यांच्या जागांवर बांधकाम पूर्ण करून घरांच्या सोडती चार टप्प्यात म्हाडाकडून काढण्यात आल्या आहेत.

Affordable Housing Mumbai
Affordable Housing Mumbai

आत्तापर्यंत १३ हजार १६१ गिरणी कामगारांना घरं दिली आहेत.एमएमआरमध्ये अंदाजे एक लाख इतकी घरे उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या वर्षी निर्णय घेतला आहे.एकूण सात जागांवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचं ठरवले आहे. गिरणी कामगारांना परवडणारी घरे योजनेतून घरे उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी हौसिंग स्टॉकही वाढवला जाईल. त्यासाठी नियमात बदलही केले जातील,अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

धारावीचा पुनर्विकास ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, धारावीचा पुनर्विकास हे आमचे वचन आहे. या पुनर्विकासामुळे मुंबईचे नाही तर, देशाचं नाव जगात मोठं होईल. धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी नाही तर जगातला सर्वात मोठा पुनर्विकासाचा गृहनिर्माण प्रकल्प अशी ओळख होणार आहे. या प्रकल्पामुळे धारावीकरांचं जीवनच बदलून जाणार आहे.आम्ही धारावीतल्या प्रत्येकाचं पुनर्वसन करणार आहोत. एकूण ७२ हजार कुटुंबांचं पुनर्वसन होणार आहे. हा पुनर्विकास फक्त पायाभूत सुविधांचा नाही, तर रोजगार,  शिक्षण, आरोग्य, आणि सामाजिक सलोख्याचं मॉडेल ठरेल. हे ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेनं उचललेलं ऐतिहासिक पाऊल आहे.

परवडणारी ३५ लाख घरे बांधणार

परवडणाऱ्या घरांसाठी नवीन गृहनिर्माण धोरण तयार केले असून ७० हजार कोटींची गुंतवणूक करून ३५ लाख घरे बांधणार आहोत. सर्वसामान्यांना हक्काची परवडणारी, पर्यावरणपूरक घरे मिळणार आहेत. मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्नही खूप मोठा आहे. मुख्यमंत्री असताना बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मध्ये (अधिनियम 1976) सुधारणा केल्या आणि त्यामुळे आता अर्धवट सोडलेले प्रकल्प झपाट्याने पूर्ण करता येणार आहेत.

 

रखडलेल्या ‘एसआरए’च्या योजना सरकारी संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होऊन ४० लाख झोपडपट्टीवासियांना घरे देण्याचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Affordable Housing Mumbai
Affordable Housing Mumbai

मुंबईत खड्ड्यांच्या तक्रारीसाठी ऑनलाईन पोर्टल

मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने झोन निहाय समर्पित एजन्सी नेमून खड्डे तक्रारीवर कार्यवाही केली जात आहे. दरवर्षी खड्डे भरण्यासाठी जेवढा खर्च लागतो तो यावर्षी ५० टक्क्यांनी कमी झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी ऑनलाईन पोर्टल त्याचबरोबर तपासणीसाठी मुंबई आयआयटी सोबत करार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

आपला दवाखान्यासाठी ११०६ कोटी रुपये

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यासाठी पुढील चार वर्षांसाठी ११०६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्राथमिक आणि अद्ययावत चाचण्या या दवाखान्यामध्ये केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईसह राज्याच्या विकासाच्या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.Affordable Housing Mumbai

 

खालील बातम्या तुम्हाला 

वाचायला आवडेल👇🏻

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार

 

 

HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या

Weekly Horoscope in Marathi : तुमच्या राशीसाठी यशस्वी आठवडा! | 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य मराठीत

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

 

 

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!

Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

What is BTS? : BTS म्हणजे काय?

 

 

ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय

ChatGPT काय आहे? | AI चॅटबॉट, उपयोग, फायदे,नुकसान, नवीन अपडेट जाणून घ्या

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

 

 

I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

 

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

 

शासनाची “महासंवाद” वेबसाईट म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विविध उपक्रमांची, योजना व जनसंपर्क यंत्रणेची अधिकृत माहिती देणारी व्यासपीठ.

महासंवाद वेबसाईटचा अधिकृत पत्ता:
https://mahasamvad.in

 

 

या वेबसाईटवर काय मिळते?

राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती

नागरिकांसाठी महत्त्वाचे अपडेट्स

शासन निर्णय, जाहिराती व बातम्या

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम व घोषणा

व्हिडिओ, फोटो गॅलरी, सोशल मीडिया लिंक

 


Spread the love
Tags: #AffordableHousingMumbai#EknathShinde#GiranikarmachariHousing#HousingForAll#MumbaiMakeover#MumbaiRedevelopment#SmartDharavi
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon Weather Alert: पावसाला ब्रेक, पुढील ५ दिवस उकाड्याचा तडाखा!

Next Post

Honeytrap Case Maharashtra ; विधानसभेत नाना पटोले यांचा स्फोटक पेन ड्राईव्ह – Honeytrap प्रकरणात भूकंप!

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
Honeytrap Case Maharashtra

Honeytrap Case Maharashtra ; विधानसभेत नाना पटोले यांचा स्फोटक पेन ड्राईव्ह – Honeytrap प्रकरणात भूकंप!

ताज्या बातम्या

Maratha Reservation GR

मराठा आरक्षण : हैदराबाद गॅझेटिअरवर आधारित पहिला GR जारी, वाचा जशाच्या तसा…

September 2, 2025
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

September 2, 2025
Cyber crime : जळगावात उघडकीस आले ‘सायबर’ रॅकेट !

Cyber crime : जळगावात उघडकीस आले ‘सायबर’ रॅकेट !

September 2, 2025
US job market crisis: 1.5 lakh Indian graduates face uncertainty

US jobs crisis: 1.5 लाख भारतीय पदवीधर विद्यार्थी बेरोजगार होण्याच्या उंबरठ्यावर ; अमेरिकेत नोकऱ्या धोक्यात!

September 1, 2025
मे उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारपुढे पेच कायम ! मराठा आरक्षण आंदोलन

मे उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारपुढे पेच कायम ! मराठा आरक्षण आंदोलन

September 1, 2025
NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

September 1, 2025
Load More
Maratha Reservation GR

मराठा आरक्षण : हैदराबाद गॅझेटिअरवर आधारित पहिला GR जारी, वाचा जशाच्या तसा…

September 2, 2025
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

September 2, 2025
Cyber crime : जळगावात उघडकीस आले ‘सायबर’ रॅकेट !

Cyber crime : जळगावात उघडकीस आले ‘सायबर’ रॅकेट !

September 2, 2025
US job market crisis: 1.5 lakh Indian graduates face uncertainty

US jobs crisis: 1.5 लाख भारतीय पदवीधर विद्यार्थी बेरोजगार होण्याच्या उंबरठ्यावर ; अमेरिकेत नोकऱ्या धोक्यात!

September 1, 2025
मे उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारपुढे पेच कायम ! मराठा आरक्षण आंदोलन

मे उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारपुढे पेच कायम ! मराठा आरक्षण आंदोलन

September 1, 2025
NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

September 1, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us