मोयगाव बु.व पिंपळगाव गोलाईत (ता. जामनेर) :“प्रकृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे. वृक्षारोपण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आधीपासून असलेल्या वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज यांनी केले.
आई भवानी देवराई, मोयगाव बु.व पिंपळगाव गोलाईत येथे नुकत्याच पार पडलेल्या वृक्षारोपण सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.पुढे ते म्हणाले की,चांगले कार्य सुरू करण्यासाठी एकट्याला करावे लागले तरी केले पाहिजे त्याचे चांगले परिणाम पाहून समाज आपोआप सामील होतो. आई भवानी देवराई परिसरात गेल्या वर्षांत तब्बल ३२०० झाडांची लागवड करून त्यांचे काटेकोर संगोपन करण्यात आले असून हिरवाईने नटलेला हा परिसर आज सर्वांसाठी डोळसुख व प्रेरणादायी ठरत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी हाती घेतलेल्या या कामामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी एक मौल्यवान ठेवा निर्माण होत असल्याचे यावेळी ते बोलत होते.
देवराई बहरविण्यामागे इतिहास अभ्यासक डॉ. विश्वजित सिसोदिया, महेंद्रसिंग कच्छवाह सर व संपूर्ण वसुंधरा फाउंडेशनच्या टीमचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद करून महाराजांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.यावेळी आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ डॉ के बी पाटील साहेब यांनीही मार्गदर्शन केले.
आई भवानी देवराई एक सचित्र वनगाथा …पुस्तकाचे प्रकाशन
या प्रसंगी डॉ विश्वजीत सरांच्या ‘ *आई भवानी देवराई एक सचित्र वनगाथा* या पुस्तकाचे प्रकाशन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.*देवराई* ही संकल्पना प्राचीन काळात कशी उदयास आली?,आई भवानी देवराई ही कल्पना कशी सुचली? , पर्यावरण रक्षणात
देवराई चे महत्व काय ? या माहितीवर आधारित हे पुस्तक आहे.
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेने तर्फे विशेष सन्मान
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रवीणसिहं पाटील, विलाससिंह पाटील, विठ्ठलसिहं मोरे, श्री.भगवानसिंह खंडाळकर यांच्या वतीने प.पू. महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांनी अद्वितीय अध्यात्मिक प्रवचनांनी समाजात धर्म, मूल्ये व जागृतीचा दीप प्रज्वलित केला आहे.समाजसेवेच्या प्रेरणादायी कार्यासाठी व सदैव मार्गदर्शक ठरलेल्या दिव्य व्यक्तिमत्त्वाचा
“ सन्मान चिन्ह”. देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर आई भवानी देवराईत ३२०० वृक्ष जगवून हरित क्रांती घडवणाऱ्या इतिहास अभ्यासक डॉ. विश्वजित सिसोदिया यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला त्या सोबतच त्यांच्या टीमचा देखील ‘सन्मान चिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.के.बी.पाटील ,प.पू.श्यामचैतन्यजी महाराज ,करणी सेनेचे,विलाससिंह पाटील, विठ्ठलसिंह मोरे, भगवान खंडाळकर,नजरकैदचे संपादक प्रवीण भाऊ सपकाळे,मोयगावचे सरपंच प्रा.महेंद्रसिंह कच्छवाह सर,मा.सभापती नवलसिंह पाटील,प्रदीप लोढा,एड.देवेंद्रसिंह जाधव, पिंपळगावच्या सरपंच सौ.उषाताई संदीप पाटील,दिलीपसिंह पाटील,जामनेर वनविभाग व वनिकरण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यांनी जगवली वृक्ष
वसुंधरा फाउंडेशनचे डॉ विश्वजीत भुजंगराव सिसोदिया सर, सरपंच महेंद्रसिंग कच्छवाह सर, जीवनसिंह पाटील,नंदू पाटील, गजानन कछवाह, गणेश पवार,संजय बाबुराव पाटील,प्रेमजीत सिसोदिया, गजानन जालमसिंग सिसोदिया, जितेंद्र महाले, नामदेव चव्हाण,सोपान कवळे, उल्हास सिसोदिया,विरेंद्र सिसोदिया,मनोहर सिसोदिया,विकी माळी, अभिषेक पाटील, गणेश प्रकाश पाटील,राणाजी टेलर,एस.आर.पाटील सर, पृथ्वीराज पाटील, दामोदर पाटील,प्रा.डी.एस पाटील सर यांनी मेहनत घेतली.
प्रवीणसिंहजी पाटील यांचा दोन्ही गावे मिळून भव्य नागरी सत्कार
मूळचे मोयगाव येथील व सध्या जळगाव येथील रहिवासी, उद्योजक श्री.प्रवीणसिंहजी पाटील यांना श्री. राष्ट्रीय राजपूत करणे सेनेचे पद मिळाले त्या निमित्ताने मोयगाव आणि पिंपळगाव गोलाईत या दोन्ही गावांच्या गावकऱ्यांच्या वतीने महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांनी त्यांचा सत्कार केला.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, डॉ के बी पाटील, प्रवीणसिंह पाटील,प्रवीणभाऊ सपकाळे , देवेंद्रसिंह जाधव, महेंद्रसिंग कच्छवाह सर, डॉ.विश्वजीत सर,यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.उपस्थित महिला व आबालवृद्धांनी या वृक्षारोपणात सहभाग नोंदविला.