भुसावळ, (डी.आर.गणवीर) – शहराच्या जवळच असलेल्या कंडारी गावात अवैधरित्या हातभट्टी दारू विक्रीला उत आला असून याकडे पोलीस प्रशासनाने डोळेझाक केल्याने लॉकडाऊन काळातही गावठी हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
कंडारी गावा जवळील नदीकाठी आजू बाजूच्या गावातून ही दारू आणुन कंडारी वार्ड क्र २ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मैदान जवळच विक्री होत असल्याने समाजबांधवांच्या भावना दुखावल्या जात आहे. राज्यांमधे लॉक डाऊन काळात मद्य विक्री बंद असताना सुध्दा हा मद्य अड्डा चालू असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून गावातील अवैध गावठी दारू विक्रीवर तात्काळ बंदी घालून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.