Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना आणि बेरोजगारीचे संकट !

najarkaid live by najarkaid live
April 21, 2020
in अग्रलेख
0
ADVERTISEMENT
Spread the love

आगरी कोळी कराडी!कोरोना मुळे कामधंदे बंद, त्यामुळे आर्थिक आणीबाणी निर्माण झालीय !  याच्याच आधाराने गरीब भाडेकरूंना दिलासा देण्यासाठी, शासनाने निर्णय घेतला!पुढील 3 महिन्यांसाठी घर मालकांनी भाडेकरूंकडून भाडे घेऊ नये!अनेकांनी अधिकचे फ्लॅट घेऊन भाड्याने दिले आहेत ,त्या घरमालकांचे प्रश्न आणि मूळ गावठाणात राहणाऱ्या आगरी कोळ्यांची “सत्य” परिस्थिती काय आहे ?ती सर्वांनाच समजून यावी, म्हणून हा लेखप्रपंच…
व्यवसायाने शिक्षक असूनही,नवी मुंबईत मी 1991 ते 2013 पर्यंत भाड्याच्या घरात राहिलोय,त्यामुळे भाडेकरू आणि घरमालक यांचे दुःख मी जाणतोय! मी जरी आगरी जातीचा असलो तरी “भाडोत्री” असाच माझा उल्लेख व्हायचा!  याची खंत मला नेहमीच जाणवायची!जे जे लोक नोकरी कामधंदा आणि शिक्षणासाठी,आपले मूळ गाव सोडतात त्यांना “भाडेकरू” म्हणून जे दुःख भोगायचे असते ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये?तरीही नवी मुंबईत “मालक” असलेल्या माझ्याच आगरी कोळी समाजाचे “दुःख “मी जाणून होतो,परन्तु त्याची जाणीव येथल्या भूमिपुत्रांना होत नव्हती?ती आज कोरोना मुळे झाली!नवी मुंबईच्या गावठाण प्रश्नावर प्रामाणिक काम करणाऱ्या विकास पाटील यांनी फेसबुकवरून जाहीर केले की ,नवी मुबंई तील 80 टक्के गावठाण क्षेत्रातील आगरी कोळी ओबीसी हे “भाड्यावर” जगतात.ज्यांची “प्रतिमा” हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही “पुढाऱ्यांमुळे” शेठ अशी झाली आहे !त्या समाजाला “सत्य” सांगण्याचे धाडस विकास पाटील यांनी केले!  एक वास्तववादी “युवा नेते” म्हणून होणारा त्यांचा उदय, हे “गावठाणात” नव्या सामाजिक बदलाची नांदी आहे.नव्या मुंबई तील सिडकोच्या क्षेत्रातील जमीन मालक असलेला शेतकरी, “बेरोजगार” आहे असा सरळ अर्थ या घटनेतून बाहेर पडतो!खोट्या श्रीमंतीचे आभासी रूप पांघरून, निपचित पडलेल्या या शूर धाडसी दर्यावर्दी समाजाला आता तरी जाग यावी? असे मला वाटते!आम्ही शहरांचे शिल्पकार म्हणणाऱ्या सिडकोने गावठाणे आणि तेथील सुखी समृद्ध,मातृसत्ताक आगरी कोळी कराडी समाजाला पूर्णपणे “उध्वस्त” केले आहे.नवी मुबंई चे दुसरे “राजकीय शिल्पकार ” भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेशजी नाईक!जे आपल्या मतदार बंधू भगिनींना चागली (दखलपात्र) मदत करीत आहेत….दुःख याचेच वाटते मग गावठाणातल्या “प्रश्नांना” वाली कोण?हा प्रश्न नवी मुंबई पेक्षा ,नवी मुंबई विमानतळात येथील “प्रकल्पग्रस्त “फार भयंकर पद्धतींनी अनुभवत आहेत!त्यांनी अशाच “प्रकारच्या “नेते आणि सिडकोच्या सांगण्यावरून स्वतःच्या “हाताने “आपली घरे पाडून, गावे गावठाणे उध्वस्त केली.आज ते “ना घर का? ना “कॉलनी “का?”**तर भाडेकरूंचे खरे दुःख अनुभवत आहेत.सिडको आणि महाराष्ट्र शासनाचे पुनर्वसन “फसले “आहे!नेते विमानतळाच्या भरावाचे, हजारो कोटी कमावून आपल्या नावापुढे “शेठ” ही उपाधी लावून उध्वस्त प्रकल्पग्रस्त आगरी कोळी कराडी समाजाची खरी बेकारी ,गरिबी लपवत असले तरी, वास्तव ,सत्यपरिस्थिती बदलत नाही?आता तरुणांनी या फसलेल्या “सिडको पुरस्कृत विकासाचे “खरे स्वरूप जाणून सरकारला प्रामाणिक पणे ,आपली फसगत झालीय, हे निर्भीडपणे सांगावे!कधी नव्हे असे उत्तम मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत!पुढील तीन महिने भाडे नसेल तर उपासमारीची पाळी येईल हे सांगण्याची हिम्मत लोकांनी ठेवली पाहिजे!मोठेपणाचा आव आणणे सोपे असते ,जगणे मात्र कठीण असते?मला पूर्ण कल्पना आहे माझे हे म्हणणे अनेकांना आवडणार नाही.परन्तु समाजाचे हे सारे खरे प्रश्न नवी मुबंई च्या साऱ्या राजकीय नेत्यांनी झाकली मूठ..या कुटणनीतीने “दाबून” टाकले.आज कोरोना मुळे नैसर्गिकरित्या ते बाहेर येतील,निद्रिस्त ज्वालामुखिच्या पोटात, कोंडलेल्या वाफेप्रमाणे बाहेर आले नाही? तर नवी मुबंई च्या गावठाणात राजकीय भूकंप होणार!किंवा तो सामाजिक लढ्यातही रूपांतरित होईल, यात मला अजिबात शंका वाटत नाही!1991पासून मी नवी मुबंई कर प्रकल्पग्रस्त आगरी कोळी समाजाचे निरीक्षण आणि अभ्यास करतोय!ज्या सिडकोने 100 टक्के शेतजमिनी संपादित केल्यामुळे!इथला ओबीसी भूमिहीन झाला. उध्वस्त होणाऱ्या या मागास ओबीसी समाजासाठी, बुद्ध फुले शाहू आंबेडकर या विचारांनी प्रेरित ,लोकनेते दि बा पाटील साहेबांनी  1984 ला ,सिडको विरुद्ध संघर्ष करून ,प्रथम वाचा फोडली!त्यातून “साडेबारा टक्के” विकसित भूखंड जमिनीचा मोबदला म्हणून मिळाले तरी हे खरे पुनर्वसन नव्हते!हे कोरोनामुळे स्पष्ट झाले,स्वातंत्र्यपूर्व काळात,कष्टकरी अशिक्षित,कुळे असणाऱ्या या समाजाला 1932 साली पहिला न्याय ,डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागु पाटील यांनी दिला होता!यातून उच्चवर्णीय( ब्राह्मण क्षत्रिय वैश्य )या खोतांच्या जमिनी मूळच्या शूद्र ओबीसी आगरी कोळी समाजाला, जमीन हक्कांच्या लोकशाहीवादी “संघर्षाने” मिळाल्या होत्या!हे आंदोलन रायगडात झाले !खोती विरोधी ,सिडको विरोधी,सेझ विरोधी आंदोलनाची सारी “केंद्र “ही छत्रपती शिवरायांच्या राजधानीच्या, रायगडातच होती आजही आहेत!मधल्या काळात डॉ राजेश पाटील,अड जयराम,मनोहर पाटील,दशरथ भगत यानी नवी मुबंई तही यशस्वी जागृती आणली होती !काही उच्चशिक्षित तरुणांनी ती स्वीकारली होती….??साडेबारा टक्के भूखंड विकसित करण्यास सिडको महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना “कर्ज” न दिल्यामुळे पुन्हा उच्चवर्णीय (ब्राह्मण क्षत्रिय वैश्य )हेच बिल्डर लॉबी म्हणून पुढे आले!मात्र ओबीसी शेतकऱ्यांनी आपले सर्वस्व गमावले!मूळचे आंदोलन हे मागास जातींच्या शोषणातून उभ्या राहिलेल्या उच्चवर्णीय जातींच्या वर्चस्वाच “वास्तव” आहे ही भूमिका जेवढ्या लवकर हा समाज समजून घेईल तेवढ्या लवकर समस्या सुटू शकते.लोकनेते दि बा पाटील आणि दत्ता पाटील हे दोघेही कायद्याची जाण असलेले पेशाने वकील आणि महाराष्ट्राच्या विधान सभेत विरोधीपक्ष नेतेपदी धडक मारणारे धाडसी राजकीय नेते असूनही, आम्हास पाच हुतात्मे देऊनच न्याय मिळाला!महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाचा, स्वातंत्र्या नंतरचा हा विषमतावादी शोषक इतिहास पाहिल्यास, सध्याच्या राजकीय नेतृत्वाचा “वकुब” जाणकारांच्या ध्यानात येईल.या देशात मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त पुनर्वसन कायद्याचा पाया जरी “दि बांच्या “रायगडा” तील आंदोलनाने घातला असला तरी ओबीसींच्या ,पुढल्या पिढ्यांच्या शिक्षित तरुणाईने ही मूळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची “शेतकरी चळवळ” समजून घेतली नाही.नवी मुबंई या आधुनिक शहर निर्मिती नन्तर,आज 80 टक्के भूमिपुत्र लोक “भाड्यावर” जगत आहेत हा कसला “विकास?? असे प्रश्न आजही तरुणांना पडत नसतील ?तर गरीब,अशिक्षित,बेरोजगार यांनी पहायचे कुणाकडे?मुळात सिडको ही संस्था ओबीसी आगरी कोळी कराडी आणि बारा बलुतेदार यांच्या जगण्यास उध्वस्त करणारा उच्चवर्णीय (भारतीय) “व्हायरस “आहे!1970 नंतर येथील आगरी कोळी कराडी समाजाचे मासेमारी,जलवाहतूक,सागरी व्यापार,रेती,वीटभट्टी,बागायती ,मिठागरे हे व्यवसाय उध्वस्त करण्याचे काम “सिडको” मार्फत महाराष्ट्र शासनाने केले आहे!आज घराच्या अंगणात दुसरे घर बांधून ते भाड्याने देऊन लोक कसेबसे जगताहेत!विकासाचा असा “परिणाम” असेल तर यात मूळ भूमिपुत्र उध्वस्त होणारच!सिडकोला एकरी 3 हजारात “फुकटात” जमिनी मिळाल्या त्यांनी त्यास 80 कोटी एकर, रुपये या चढ्या विक्रमी दराने विकल्या !यातला नफा खाल्ला कुणी?सरकार म्हणजे काय असते?हे प्रश्न नव्या पिढीने विचारायला हवेत!आज झोपड पट्टीत शासनाची मदत पोहचली आहे!परंतु ज्यांना 1970 नंतर शासनानेच बेरोजगार केलेय त्यांना नवे व्यवसाय देऊन पुनर्वसनाचा विषय पूर्ण करणे हे शासनाचे कर्तव्य होते!परंतु आपले प्रश्न जाहीररीत्या मांडणे,त्यावर रस्त्यावरचा सनदशीर संघर्ष करणे,अन्याविरोधात जागृती करण्यासाठी कृषिवल,आगरी दर्पण यासारखी वृत्तपत्रे चालविणे,भाषणे करणे ही दि बांची परंपरा “शेटजी भटजी” झालेल्या नवी मुंबईकर नेत्यांना मानवणारी नाही!यात सुक्या बरोबर ओलेही जळणार?शासनाने प्रकल्पग्रस्त ओबीसींची खरी स्थिती जाणावी!सिडको मधला आजचा हजारो कोटीं रुपयांचा शिल्लक पैसा हा मूळ प्रकल्पग्रस्त आगरी कोळी कराडी समाजाचा आहे!देशात आणि महाराष्ट्रात “बिनपाण्यात” बुडण्याचे ढोंग रचणाऱ्या उद्योजक,जमीनदार उच्चवर्णीय शेतकरी याना कर्ज देऊन,बुडविणार्यांना, ते माफ करणारे “शासन” हे उच्चवर्णीय मानसिकतेचे असते!महाराष्ट्र सरकारची ही “कुख्यात “ओळख पुसून सरकारला नवा “मानवी “चेहरा देण्यासाठी मा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्याची भूमिका घेऊन “आमच्याशी” न्याय करावा!मुंबई,ठाणे रायगड येथे सिडको,एमआयडीसी,रस्ते,बंदरे एमएमआररडी आणि बिल्डर भूमाफिया,आधुनिक क्लस्टर एसआरए यांनी लुटून उध्वस्त झालेल्या आगरी कोळी कराडी भंडारी ईस्ट इंडियन,आदिवासी या मूळ भूमिपुत्र “गावठाणाचा” एसआरए,क्लस्टर करून “बाजार” मांडू नये!त्यांच्या समुद्रावर आधारित आरमारी ,सागरी परंपरेचा मच्छीमारी या व्यवसायांचा विचार करून 2000 वर्षांपूर्वीची त्याची हुंडा नाकारणारी आई एकविरा मातृसत्ताक परंपरा टिकविण्यासाठी आर्थिक आणि सर्व प्रकारची मदत जाहीर करावी कारण महाराष्ट्रातून,देशातून आणि जगातूनही आलेल्या सर्वानाच या सागरपुत्र समाजांनी प्रेमाने स्वीकारून खऱ्या अर्थाने जमिनीच्या त्याग समर्पण करून देशाच्या तथाकथित विकासाला हात दिलाय, त्याचे पोटही फाडु नका! नव्या मुबंई त सर्व जाती आणि धर्माचे नागरिक अत्यन्त सुसंस्कृत पद्धतीने नांदत आहेत!कायदा सुव्यवस्था,शिक्षण,आरोग्य ,यात देशात आदर्श ठरावे असे हे शहर आहे!परंतु आपल्या पिकत्या शेतजमिनी शहर निर्मितीसाठी देणाऱ्या गावकऱ्यांशी कुणीही “कृतघ्न” होऊ नये!मी ही रायगडात जन्मलो असलो तरी मुबंई ठाणे नवी मुबंई कर लोकांच्या भाड्याच्या जगण्यावर नवा उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे!पुढच्यास ठेच मागचा शहाणा!या म्हणीप्रमाणे आपणा सर्वानाच या प्रश्नात मार्ग काढावा लागेल,कोरोनाच्या या महामारीतप्रश्न आमचेही आहेत,म्हणून हा आवाज दिला,जे प्रश्न सरकारने निर्माण केलेत!ते सरकारने सोडवावेत ही विनंती आहे!आम्ही 2000 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाचे जागतिक आरमारी सैनिक होतो,400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांचे सागरी मानकरी होतो!1932 साली भारतीय संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सख्खे भाऊ होतो!2500 वर्षांपूर्वी आई एकविरापुत्र म्हणून मातृसत्ताक जीवन पद्धतीचे जागतिक विचारांचे तत्वज्ञान मांडणारे होतो!आजच्या बिकट परिस्थितीतही मदतीचा हात या मुबंई स देत आहोत!आमचीही व्यथा ऐका!कोरोनासाठी लढणाऱ्या डॉक्टर, पोलीस,सफाईकर्मचारी,आणि मा उद्धवजी ठाकरे यांच्या सरकार सोबत सदैव सेवेस तत्पर!”we the people of india” आम्ही पुत्र भारताचे!
राजाराम पाटील
मो. 9619801684,8928452111
शेतकरी प्रबोधिनी,उरण,जिल्हा रायगड,

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वडाळा येथे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत तांदूळ वाटपास सुरुवात

Next Post

जामनेर एमआयडीसी भागात भिषण आग;जीवित हानी नाही

Related Posts

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज ; लौकिकाकडून अलौकिकाकडे एक ऐतिहासिक प्रवास…

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज ; लौकिकाकडून अलौकिकाकडे एक ऐतिहासिक प्रवास…

December 4, 2024
कलम बहादरांचा सरदार वसंत मुंडे – संघर्षाचा उत्कल बहर

कलम बहादरांचा सरदार वसंत मुंडे – संघर्षाचा उत्कल बहर

December 31, 2022
धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं…

धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं…

October 5, 2022

अहंकार मुक्त गावकी आणि भावकी..!

October 28, 2020
सागर तायडे म्हणजे वास्तववादी निर्भीडपणे लिहणारा स्तंभ लेखक

सागर तायडे म्हणजे वास्तववादी निर्भीडपणे लिहणारा स्तंभ लेखक

October 1, 2020
कोरोना युद्ध नको… बुद्ध हवा..!

कोरोना युद्ध नको… बुद्ध हवा..!

May 6, 2020
Next Post

जामनेर एमआयडीसी भागात भिषण आग;जीवित हानी नाही

ताज्या बातम्या

Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

July 26, 2025
Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

July 26, 2025
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

July 26, 2025
Load More
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

July 26, 2025
Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

July 26, 2025
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

July 26, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us