चाळीसगाव, (प्रतिनिधी) – येथील वि.का.सोसायटी वडाळा वडाळी अंतर्गत स्वस्त धान्य दुकानात सोशियल डिस्टन्स सुरक्षित अंतर ठेवून शासनाने जाहीर केलेल्या पॅकेज मधील मोफत तांदूळ वाटपास सुरुवात झाली आहे अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात येत आहे कोरोना विषाणू मुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे काम धंदा बंद असल्यामुळे गोर गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये त्यामुळे शासनाने मोफत धान्य वाढण्याचा निर्णय घेतला आहे अशा संकटाच्या वेळी शासनाने गोरगरिबांना मोफत धान्य मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते यावेळी तलाठी प्रवीण महाजन, ग्रामसेवक जगदीश पाटील, सचिव अरुण राजपूत , सरपंच अशोक आमले, पोलीस पाटील निलेश अहिरराव, वि,का, सोसायटी चेअरमन ज्ञानेश्वर आमले कोतवाल बापू कुराडे यांच्यासह संचालक मंडळ व सेल्समन बाबाजी सूर्यवंशी, बालूआबा अहिरराव,रवींद्र सूर्यवंशी, माणिक सूर्यवंशी व लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.