जामनेर :- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत शेतकरी बांधवांसाठी फवारणी पंपाचे वितरण नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते दि.८ रोजी बाजार समितीच्या आवारात पहूर येथील शेतकरी गंगाराम रामराव पाटील व संदीप शिवाजी बेढे यांना प्रातिनिधिक स्वरूपात देऊन करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती छगन झाल्टे,जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील,बाजार समितीचे सभापती संजय देशमुख,संचालक प्रमोद पाटील,पद्माकर पाटील, ईश्वर कोळी,संचालिका उज्वला जंगले,संगिता महाजन,सचिव प्रसाद पाटील,संजय लोखंडे यांच्यासह समितीचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री व आपल्या जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर कॉसमॉस कंपनीचा १२ बाय १२ व्होल्ट बॅटरीचा टू इन वन असा १८ लिटर क्षमतेचा फवारणी पंप फक्त १ हजार सातशे पन्नास रुपयात देण्यात येत असून त्यासाठी शेतकऱ्यांनी शेताचा सातबारा उतारा व आधार कार्डची झेरॉक्स घेऊन बाजार समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन यावेळी सभापती संजय देशमुख यांनी केले आहे.