- पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांची मागणी
- महाविद्यालयाच्या आवारातील जंगलराज थांबवा – कर्मचारी पी.डी.पाटील
- १० रोजी १ दिवस १५० कर्मचारी आंदोलन करणार
जळगाव ;- येथील मु.जे. महाविद्यालयात नुकताच एका तरुणाचा खून करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली होती . त्या पार्शवभूमीवर नूतन मराठा महाविद्यालयात देखील गेल्या दोन वर्षात गुंडगिरी वाढली असून या गुंडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांनी आज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. एल.पी देशमुख म्हणाले कि , गेल्या वर्षभरात विजय भास्कर पाटील,मनोज भास्कर पारिल ,पियुष नरेंद्र पाटील यांनी साथीदारांसह नूतन महाविद्यालयाच्या आवारात माझ्यासह शिक्षकेतर कर्मचारी,सुरक्षा रक्षक,यांच्यावर हल्ले चढवून दहशत निर्माण केली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनला वेळोवेळी अनेक तक्रारी देण्यात आल्या आहेत.या तक्रारींवर आजपर्यंत दखल घेतली गेली नाही.उलट भादंवि कलम 307 सारख्या गुन्ह्यात फरार असलेल्या या आरोपींचे मे.उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यावर देखील जिल्हापेठ पोलीस त्यांना अभय देत आहे. जिल्हापेठ पोलीस सदर आरोपींवर कारवाई करण्यास टाळाटाळ का? करीत आहे. मु.जे. महाविद्यालयात घडलेली दुर्दैवी घटनेची नूतन मराठा महाविद्यालयात व्हावी याची वाट पाहताय का? असा सवाल देखील प्राचार्य देशमुख यांनी उपस्थित केला. विजय भास्कर पाटील,मनोज भास्कर पारिल,पियुष नरेंद्र पाटील आदींवर तात्काळ कारवाई न झाल्यास १० रोजी नूतन मराठा महाविद्यालचे सुमारे दीडशे कर्मचारी १ दिवस काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला मात्र यापुढेही कारवाई न झाल्यास कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्यावतीने बेमुदत कामबंद करणार असल्याची माहिती यावेळी दिली.
जंगलराज हटवा – पुण्यप्रताप पाटील
नूतन मराठा महाविद्यालय आवारात गेल्या दीड दोन वर्षा पासून प्राचार्यासह, कर्मचारी, सुरक्षा रक्षक प्राणघातक हल्ला करणाऱ्यांनी महाविद्यालय परिसरातील शैक्षणिक वातावरण दूषित केले असून ज्ञान दानाच्या पवित्र ठिकाणी दहशत निर्माण करून जंगलराज चालविला आहे. हा जंगलराज जिल्हापेठ पोलीस प्रशासनाने तात्काळ थांबवावा व कर्मचारी, विद्यार्थ्यांना भयमुक्त करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुण्यप्रताप पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.