ना. महाजन ,पक्षश्रेष्टीं घेतील तो निर्णय मान्य
जळगाव ;- आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर मतदार संघाची जागा हि शिवसेनेच्या वाटेला येणार असल्याने आणि या जागेसाठी माजीमंत्री हे इच्छुक असल्यामुळे हि जागा जवळपास शिवसेनेला सुटणार आहे . यावर आ. राजूमामा भोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कि , जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे जो काही निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असून सेनेच्या उमेदवाराचाही प्रचार करण्याची आपली तयारी असल्याची भूमिका आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केली .
पत्रकार परिषदेला महापौर सिमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर ललीत कोल्हे, नगरसेवक किशोर बावीस्कर, विशाल त्रिपाठी, राजेंद्र घोगेपाटील मनोज भांडारकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेतर्फे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमिवर पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य राहील. आम्ही पक्षश्रेष्ठींच्या बाहेर नाही. ना. महाजन जो निर्णय देतील तो मान्य राहील. जर वरुन निर्णय आला सेनेचा प्रचार करायचा तर सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास तयार असल्याचे ते यावेळी म्हणाले
भाजपातर्फे भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीदिनी 6 जुलै शनिवारपासून भाजपातर्फे सदस्यता अभियान, नवीन मतदार नोंदणी व वृक्षारोपण अभियानास ना. महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. या अभियानाची माहिती तसेच सत्ताधारी भाजपाने शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्यातून आणलेल्या 873 कोटीच्या निधीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच केंद्र व राज्यशासनाकडून 873 कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी आलेला आहे. मूलभूत सोयी व भूसंपादनासाठी दोनशे कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा करणार आहे. अनेक अडचणींमुळे कामांना उशीर होत असल्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. शहराच्या विकासाची अनेक कामांचे केवळ भूमिपूजन बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. तर काही कामे पाईपलाईनमध्ये असल्याचे सांगितले.
शहरातील 1010 बेघरांना घरांचा लाभ मिळवून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एकूण 873 रुपयांच्या निधीपैकी केवळ वीज मंडळाला 450 कोटींचा निधी मंजूर असून केबल अंडरग्राऊंड करण्यात येणार आहे. पोलीस बांधवांना चांगले घरे देण्यासाठी 70 कोटीचा निधी आणला आहे. जिल्ह्यातील आमदार व खासदारांच्या निधीतून 20 कोटीचा निधी विकासकामांसाठी दिला आहे.