पाचोरा- येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव तर्फे १जुलै २०१९ रोजी डॉक्टर्स डे, सीए डे, व शेतकरी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष डॉ. भूषण मगर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी परिसरातील सुमारे ७५ वैद्यकीय व्यावसायिकांना सन्मानित करण्यात आले तसेच पाच सीए व शेतकरी प्रतिनिधी म्हणून बाफना कृषी विद्यालयाचे अध्यक्ष रमेश बाफना यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक जुलै रोजी वाढदिवस असलेले डॉ. भरत पाटील, डॉ.आलम देशमुख, व व डॉ. सुरेश भोसले यांचे हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने झालेल्या चर्चासत्रात डॉक्टर्स कडून समाजाची अपेक्षा या विषयावर रो. नीरज मुणोत व रो. सुयोग जैन यांनी आपले मत मांडले तर समाजाकडून डॉक्टरांची अपेक्षा याबाबत डॉ. रुपेश पाटील यांनी आपले परखड मत मांडले. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ भूषण मगर यांनीही आपल्या मनोगतात डॉक्टर व समाज यांच्यातील सकारात्मक संबंधाबाबत मांडणी करताना डॉक्टरांनी सामाजिक जबाबदारी म्हणून आपली सेवा देत राहावी असे मत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर व व डॉक्टर यांचा २०० सीताफळाची रोपे देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, युवा नेते अमोल शिंदे, नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बीलदीकर, संजय कुमावत,रवी केसवानी, नगरसेवक विकास पाटील, छोटू चौधरी, रणजीत पाटील,पत्रकार यांचेसह शहरातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
रोटरी क्लबचे सचिव डॉ बाळकृष्ण पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रा. शिवाजी शिंदे व प्रा सी एन चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.