पाचोरा ता. – येथील पीटीसी संस्थेच्या एम एम महाविद्यालयास बेंगलोर येथील नॅक गुणांकन समितीने बुधवार ता 12 रोजी भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. तसेच विद्यार्थी, माजी विद्यार्थी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत चर्चा केली. आज गुरुवार ता 13 रोजी समिती सदस्य प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बैठका घेऊन तसेच उर्वरित विभागांची पाहणी करून समितीस अहवाल सादर करणार आहेत.
एम एम महाविद्यालयास गेल्या वेळी नॅक समितीच्या वतीने ‘बी’ग्रेड देण्यात आली होती. यावेळी ग्रेड व गुण वाढ व्हावी यासाठी महाविद्यालयाने सर्वच विभाग अपडेट केले आहेत. क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, प्रशासकीय इमारत यासह एकूणच महाविद्यालयाचा परिसर सुविधांनी परिपूर्ण व सुशोभित केला आहे. बेंगलोर येथील समितीच्या वतीने डॉ हरीश शर्मा,डॉ लॉरीन तुलूंगा,ङॉ रहेमान शरीफ,प्रा नीलिमा गुप्ता या 4 सदस्यीय समितीने महाविद्यालयास भेट दिली. विविध विभागांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी चर्चा केली. माजी विद्यार्थी संघाची स्वतंत्र बैठक घेऊन महाविद्यालयाच्या विकासासाठी माजी विद्यार्थी संघ करीत असलेल्या कार्याची माहिती जाणून घेतली. तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी महाविद्यालयातील सुविधा व भविष्यातील सुविधांची पूर्तता या संदर्भात माहिती घेतली, चर्चा केली व गुणवत्ता वाढी संदर्भात काही महत्वपूर्ण टिप्सही दिल्या.
यावेळी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ पी पी माहूलीकर, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी, संचालक डॉ जयंतराव पाटील, दूष्यंतभाई रावल, दक्षता समितीचे चेअरमन प्रा सुभाष तोतला ,संजय कुमावत,प्रा डाॅ नारायण नेरकर,प्रा डॉ वासुदेव वले, सुनील पाटील ,रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.
आज गुरुवार ता 13 रोजी समितीकडून उर्वरित विभागांची पाहणी तसेच प्राध्यापक, कर्मचारी यांच्याशी चर्चा करणार आहेत .नॅक मानांकनासाठी पीटीसी संस्था व महाविद्यालयाने गुणवत्तावाढ व परिसर सुशोभीकरणासाठी केलेल्या सुविधा विचारात घेता महाविद्यालयाच्या ग्रेड व गुणांमध्ये वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
फोटो= पाचोरा महाविद्यालयास नॅक समितीच्या पाहणी प्रसंगी डाॅ हरिष शर्मा ,डॉ लारीन तुलुंगा,डॉ रहेमान शरीफ,प्रा नीलिमा गुप्ता , प्रा डॉ पी पी माहुलीकर, संजय वाघ , व्ही टी जोशी , प्रा सुभाष तोतला आदि .