बाबरुड (ता. पाचोरा | प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी, वेळेची नासाडी आणि आधुनिक सुविधांचा अभाव यावर ठोस उत्तर देणारा उपक्रम बाबरुड (रा.) येथे साकार झाला आहे. पत्रकार सुनिल कोळी यांनी “शेतीला जोडधंदा” या संकल्पनेतून सुरू केलेले अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र ग्रामीण स्वावलंबनाच्या दिशेने उचललेले प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.
आजही शेतीसाठी लागणारी औजारे, विविध ऑनलाईन सेवा तसेच पैसे काढणे–भरणे यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. या धावपळीत वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणावर वाया जातात. ही गरज अचूक ओळखून सुनिल कोळी यांनी गावातच सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
केंद्रामार्फत उपलब्ध प्रमुख सेवा :
➡️ शेतीसाठी लागणारी औजारे व साहित्याची ऑनलाईन मागणी
➡️ शेतकरी व नागरिकांसाठी सुरक्षित व विश्वासार्ह आर्थिक सेवा
➡️ पैसे काढणे, भरणे तसेच डिजिटल व्यवहारांची सुविधा
➡️ ग्रामीण भागासाठी सुलभ व मार्गदर्शित डिजिटल सेवा
या सेवा केंद्राचे उद्घाटन गोविंदा कोळी यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी निवृत्त न्यायाधीश दयाराम कोळी, न्यायाधीश मंगेश कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“ग्रामीण भागात अशा प्रकारची सेवा केंद्रे उभी राहिल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि डिजिटल इंडिया ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल,” असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
हे केंद्र केवळ व्यवसायापुरते मर्यादित नसून सेवा, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण विकास यांचा त्रिवेणी संगम आहे. पत्रकारितेच्या जोडीला समाजोपयोगी उपक्रम राबवून सुनिल कोळी यांनी ग्रामीण तरुणांसमोर सकारात्मक व प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.
बाबरुड व परिसरातील शेतकरी व नागरिकांना आवाहन :
शेतीसाठी लागणाऱ्या सुविधा, ऑनलाईन औजारे आणि आर्थिक सेवांसाठी आता बाहेरची धावपळ नको.
आपल्या गावातच उपलब्ध असलेल्या सुनिल कोळी यांच्या ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्राचा लाभ घ्या.
गावाचा विकास, शेतकऱ्याचा विश्वास आणि आधुनिकतेची जोड — हेच या केंद्राचे ब्रीदवाक्य आहे.
याप्रसंगी राकेश कोळी, पत्रकार प्रवीण मिस्त्री, पत्रकार राजेंद्र खैरनार, अतुल कोळी, अनिल तडवी, पत्रकार शिवाजी सुतार, किरण सूर्यवंशी, रमेश चौधरी, युवराज वाघ, संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तुषार आढाव, गुलाब तडवी, राजू गवहाडे, मनोज वाघ, अशोक सूर्यवंशी, शंकर डारकोंडे, किरण पवार, राजू काले, जयराम जगताप, सुरेश सालुंके, रविंद्र वाणी, मधुकर वाणी, सुरेश गव्हाडे, चंद्रकांत सालुंके, राहुल बडगुजर, विजय सालुंके, संजय वाघ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











